रहाटीकर सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:49 AM2020-12-04T04:49:01+5:302020-12-04T04:49:01+5:30

कार्यक्रमासाठी संघटनेचे कोषाध्यक्ष एस.एस.विश्वासराव, उपाध्यक्ष गोपाळ टोकले, परमेश्वर पांडागळे, लता चिंचकर, सहसचिव कैलास चोंडे, कार्याध्यक्ष एस.यू.घोरबांड, मानद अध्यक्ष विलास ...

Rahatikar retired | रहाटीकर सेवानिवृत्त

रहाटीकर सेवानिवृत्त

Next

कार्यक्रमासाठी संघटनेचे कोषाध्यक्ष एस.एस.विश्वासराव, उपाध्यक्ष गोपाळ टोकले, परमेश्वर पांडागळे, लता चिंचकर, सहसचिव कैलास चोंडे, कार्याध्यक्ष एस.यू.घोरबांड, मानद अध्यक्ष विलास नारनाळीकर, सल्लागार जे.एस.घटकार, संघटक जे.पी.मुंडकर, राधा पोटे, प्रसिध्दी प्रमुख एस.एन.गिरी सदस्य परमेश्वर कागणे, एम.एस. जामगे, श्यामबाला डोईजड, हनुमंत डावकरे, रोहिदास टेंभुर्णे आदींनी परिश्रम घेतले

एस.के.गजभारे सेवानिवृत्त

घुंगराळा : नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील विमा विकास अधिकारी एस.के.गजभारे ३३ वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृतीबद्दल समाज बांधवातर्फे उरूवेला बुद्धविहार घुंगराळा येथे सत्कार करण्यात आला. प्रा.डॉ.माधवराव वाघमारे व राजू सोनसळे, दीपक गजभारे, उत्तम गजभारे यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भंते कीर्ती आनंद या बरोबरच पोचिराम गजभारे, गणपतराव गजभारे, निवृती आढाव, अमृताराव गजभारे, रमेश आढाव, भीमराव गजभारे, माधव गजभारे, मिलिंद गजभारे, गंगाधर गजभारे, परबतराव हणमंते, साहेबराव गजभारे, आचूत सोनसळे, संघरत्न ढवळे उपस्थित होते.

चातुर्मास पुरुषोत्तम ग्रथांची सांगता

आरळी : बिलोली तालुक्यातील तोरणा येथील दत्त मंदिरात मागील चार महिन्यापासून चालू असलेला चातुर्मास सोहळा व पुरुषोत्तम ग्रथांची पूजाविधी व महाप्रसादाने कार्तिकी पाैर्णिमेच्या दिनी सांगता करण्यात आली.

गंगाराम पा. हिवराळे, धर्मगिरी महाराज, श्रीराम हिवराळे यांनी सुचकाचे काम पाहिले तर आनंदराव पा.नरवाडे, बालाजी पोपा, विश्वाभंर नरवाडे यांनी वाचकाचे काम केले. बालाजी हौसाजी हिवराळे, मुक्ताबाई नरवाडे, लक्ष्मीबाई नरवाडे, ललिताबाई हिवराळे, सोदरबाई नरवाडे, गंगाबाई नरवाडे, गिरिजाबाई नरवाडे, धोड्यांबाई नरवाडे, रेजाबाई नरवाडे, महाजन पा. नरवाडे, विद्याताई गिरी आदीसह ६० पारेकऱ्यांनी पारा सेवा केली. येथील पुजारी महापूजा आचार्य धर्मगिरी महाराज यांनी महापूजेची सेवा केली.

रस्त्याची पाहणी

निवघा बाजार - मौजे कोळी ता.हदगाव येथील अंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामांची पाहणी माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी केली. या कामासाठी आष्टीकर यांनी ६० लाखांचा निधी दिला होता. गावातील अंतर्गत राजकारणामुळे कामाला विलंब लागला. नंतर सर्वांची नाराजी दूर झाली आणि कामाला सुरुवात झाली. यावेळी भगवानराव शिंदे, विनायकराव कदम, संदीप पाटील, बाळू पाटील, राजेंद्र जाधव, प्रवीण जगताप, संतोष क्षीरसागर आदी उपस्थित होते.

लोहा तहसीसमोर धरणे

लोहा : येथील उपजिल्हा रुग्णालयाला शहीद संभाजी कदम यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी माजी सैनिक संघटनेच्या वतीने लोहा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यापूर्वी लोहा पालिकेने गोविंदराव पाटील चिखलीकर यांचे नाव रुग्णालयाला देण्याचा ठराव संमत केला होता. गोविंदराव पाटील चिखलीकर हे प्रतापराव पा.चिखलीकर यांचे वडील आहेत. मात्र माजी सैनिक संघटनेने या निर्णयाला विरोध केला.

Web Title: Rahatikar retired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.