कंधारच्या प्रसिद्ध बाजारपेठेतील जुगार अड्डयावर छापा; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, २७ जणांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 01:19 PM2024-09-18T13:19:00+5:302024-09-18T13:20:16+5:30
कंधार शहरातील प्रसिद्ध बाजारपेठेमध्ये एका पडक्या वाड्यामध्ये सुरू होता जुगार अड्डा
- मारोती चिलपिपरे
कंधार (नांदेड): कंधार शहरातील प्रसिद्ध बाजारपेठमधील एका पडक्या वाड्यामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी ( दि. १७) पहाटे ३ ते ४ वाजताच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली. यावेळी जुगार खेळणाऱ्या २७ जणांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रोख रकमेसह ७ लाख ६४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कंधार शहरातील प्रसिद्ध बाजारपेठेमध्ये एका दार नसलेल्या पडक्या वाड्यामध्ये काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून मंगळवारी पहाटे ३ ते ४ वाजताच्या सुमारास पोलिस पथकाने याठिकाणी छापा टाकला. यावेळी जुगाराचे साहित्य, नगदी २ लाख ९३ हजार १०० रुपये, २५ मोबाईल असा एकूण ७ लाख ६४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर जुगार खेळणाऱ्या २७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सानप हे करीत आहेत.
यांच्यावर दाखल झाला गुन्हा
सचिन गुट्टे, लखन कहाळेकर, सतीश नळगे, धनराज लुंगारे, स्वप्निल कदम, ज्ञानोबा केंद्रे, दिलीप पवार, अतुल पापीनवार, राजू पवार, चांदु साखरे, पवन राठोड, साहेबराव वाघमारे, आकाश इंगोले, शिनू साकडे, अशोक वाघमारे, रामा काळेकर, रूपक व्यवहारे, तुषार गवळे, राजू साखरे, माधव गिरे, बालाजी केंद्रे, रमेश पवार, दत्ता केंद्रे, अविनाश गोरटकर, कपिल जोंधळे, महेश पिनाटे, दिग्विजय मोरे या २७ जणांविरूध्द पोलीस उपनिरीक्षक गोपाळ इंद्राळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदयानुसार कंधार ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.