रेल्वे, बसेस हाऊसफुल्ल, नांदेड-पुणे सर्वाधिक गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:26 AM2019-05-25T00:26:21+5:302019-05-25T00:27:05+5:30
उन्हाळी सुट्या असल्याने सध्या सर्वच मार्गावरील बसेस आणि रेल्वेला तुफान गर्दी पहायला मिळत आहे़ नांदेड येथून पुणे, मुंबई जाणाऱ्या जवळपास सर्वच रेल्वेचे वेटींग शंभरावर पोहोचले असून बसेससह खासगी ट्रॅव्हल्सही हाऊसफुल्ल धावत आहेत़
नांदेड : उन्हाळी सुट्या असल्याने सध्या सर्वच मार्गावरील बसेस आणि रेल्वेला तुफान गर्दी पहायला मिळत आहे़ नांदेड येथून पुणे, मुंबई जाणाऱ्या जवळपास सर्वच रेल्वेचे वेटींग शंभरावर पोहोचले असून बसेससह खासगी ट्रॅव्हल्सही हाऊसफुल्ल धावत आहेत़
मराठवाड्यातील प्रमुख दोन शहरांपैकी नांदेड एक असून नांदेड स्थानकातून जवळपास देशाच्या कानाकोपºयात जाणाºया रेल्वे धावतात़ परंतु, उन्हाळी सुट्यांमुळे प्रवाशांची झालेली गर्दी पाहता नांदेडातून धावणाºया सर्वच गाड्यांना तुडुंब गर्दी आहे़ प्रवाशांना लांब पल्ल्यासाठी आरक्षण आवश्यक असते़ परंतु, नांदेड येथून धावणाºया जवळपास सर्वच रेल्वे गाड्यांचे वेटींग शंभर ते तीनशेपर्यंत पोहोचले आहे़ तपोवन एक्स्प्रेस शंभर ते एकशे तीस, देवगिरी एक्स्प्रेस - १५० ते १६५ आणि नंदीग्राम एक्स्प्रेसला २२० ते २९० पर्यंत वेटींग आहे़ त्यातच नांदेडहून पुण्यासाठी असलेल्या पुणे एक्स्प्रेसची वेटींग लिस्ट दीडशेंच्या घरात राहत आहे़ सदर वेटींग जवळपास जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम आहे़ त्यामुळे ऐनवेळी मुंबई, पुणे प्रवास करणाºया प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सशिवाय पर्याय राहत नाही़
नांदेड येथून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने पुण्यासह कोल्हापूर, सोलापूर, लातूर, औरंगाबाद, नागपूर, हैदराबाद, शेगाव या मार्गावर आरामदायी तसेच शिवशाही बसेस चालविण्यात येतात़ परंतु, खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत शिवशाहीचे तिकीट अधिक आहे़ त्यामुळे बहुतांश प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सला पसंती देतात़ मात्र, उन्हाळी सुट्यांमुळे सध्या खासगी ट्रॅव्हल्स हाऊसफुल्ल धावत असल्याने सध्या शिवशाहीसह इतरही बसेसला तुडुंब गर्दी पहायला मिळत आहे़
नांदेड शहरातून पुणेसाठी दररोज पन्नासहून अधिक ट्रॅव्हल्स धावतात़ यामध्ये सध्या मोठी वाढ झाली असून दुहेरी तिकिटाच्या नावावर प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे़ पुण्यासाठी ५०० ते ७०० रूपये तिकीट स्वीकारणाºया ट्रॅव्हल्स कंपन्या सध्या १००० ते १८०० रूपये भाडे घेत आहेत़
शिवशाही बस उरली नावालाच
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मोठा गाजावाजा करीत सुरू केलेली शिवशाही आता नावालाच ‘शिवशाही’ राहिली आहे़ शिवशाही गाड्यांची अवस्था भंगार होत असून याकडे एस.टी. प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे़
मराठवाड्यातील मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
नांदेड विभागातून मुंबई, पुण्यासाठी स्वतंत्र एक्स्प्रेस सोडण्याच्या प्रवाशांच्या मागणीकडे रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे़ मुंबई, पुणे मार्गावर नेहमीच गर्दी असते़ त्यात उन्हाळी सुट्या आणि दिवाळीमध्ये चार ते पाच पट वाढ होते़
यानिमित्त विशेष गाडी चालविण्याचे नियोजनही रेल्वे प्रशासन करीत नाही़ खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या आणि नांदेडच्या रेल्वे अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याच्या लोकप्रतिनिधींकडून होणाºया आरोपात तथ्य वाटते़