रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार भविष्यात रेल्वे धावतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:43 AM2021-01-13T04:43:54+5:302021-01-13T04:43:54+5:30

मुदखेड रेल्वेस्थानकातील ऑल इंडियन एससी अँड एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्या कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, ...

Railways will run in future as per the order of the Ministry of Railways | रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार भविष्यात रेल्वे धावतील

रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार भविष्यात रेल्वे धावतील

Next

मुदखेड रेल्वेस्थानकातील ऑल इंडियन एससी अँड एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्या कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, रेल्वेस्थानक परिसरातील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी उद्यानासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती पावले लवकरच उचलली जातील. गेल्या १० महिन्यांत कोरोनामुळे रेल्वे वाहतूक रद्द करण्यात आली; पण रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार रेल्वे गाड्या चालवण्यात येतील. मुदखेड येथील रेल्वेच्या रखडलेल्या अडचणींबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी उपेंद्र सिंघ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास अतिरिक्त डीआरएमचे नागभूषण राव, बांधकाम विभागाचे शिवाराम, पी. रवी कुमार, विभागीय अध्यक्ष ए. एन.र्निफिम, पी.पेरुमल, ए.आर. राजशेखर, माजी नगराध्यक्ष देवीदास चौंदते, नगरसेवक कमलेश चौंदते, बालाजी थोरात उपस्थित होते. सूत्रसंचालन बालाजी थोरात यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Web Title: Railways will run in future as per the order of the Ministry of Railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.