पावसाने बारड शिवारातील बंधारे खरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:31 AM2018-06-25T00:31:07+5:302018-06-25T00:32:22+5:30
बारड शिवारात शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाअंर्तगत लघू सिंचन विभाग नांदेडअंर्तगत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले़ त्या माध्यमातून बंधारे उभारणी करण्यात आली आहे़ परंतु, हे बंधारे अद्यापही अर्धवटच असून पिचिंगचा वापर केला गेला नसल्याने पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी बंधारे खरडून गेले आहेत़ त्याचा फटका बंधाऱ्यालगत असलेल्या शेतक-यांनाही बसला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
बारड : बारड शिवारात शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाअंर्तगत लघू सिंचन विभाग नांदेडअंर्तगत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले़ त्या माध्यमातून बंधारे उभारणी करण्यात आली आहे़ परंतु, हे बंधारे अद्यापही अर्धवटच असून पिचिंगचा वापर केला गेला नसल्याने पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी बंधारे खरडून गेले आहेत़ त्याचा फटका बंधाऱ्यालगत असलेल्या शेतक-यांनाही बसला आहे़
लघू सिंचन विभागअंर्तगत या परिसरातील एका बंधाºयात १० लाख ३९ हजार रुपये खर्च करण्यात आला असून या ठिकाणी आठ बंधाºयांची उभारणी करण्यात आली आहे. ही कामे बोगस झाली असून बंधारा खोलीकरण, सिमेंट कमी वापरल्याने कामात भेगा, लांबी-रुंदीचे कामे निकृष्ट तसेच पिचिंग न करताच बिले उचलले़
तसेच या बोगस कामाची चौकशी करून ही कामे निविदेनुसार करावीत़ या कामात हयगयी करणाºया संबंधित अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे भा.ज.पा.युवा तालुकाध्यक्ष सरजेश देशमुख, सचिन कनसठे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
परंतु या कामाची चौकशी अद्याप झाली नसल्याने खंत व्यक्त करण्यात येत आहे. या भागात शेतकºयांना पाणी उपलब्ध होण्यासाठी बंधारा योजना राबविली़ परंतु, ती अर्धवट अवस्थेत असल्याने सर्व्हे नंबर ८४ मध्ये केलेल्या बंधाºयात पाणी जमा न होता कमी खोली व पिचींग केली नसल्याने आलेले पाणी शेतकºयांच्या शेतात जात असून त्यामुळे जमीन खरडून जात आहे़
याबाबत विभागाच्या संबंधित अधिकाºयांशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही़ याबाबत शेतकºयांतून संताप व्यक्त होत आहे़