अतिवृष्टीनंतर विमा कंपनीकड तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:22 AM2021-09-12T04:22:33+5:302021-09-12T04:22:33+5:30

चौकट.... अतिवृष्टीने ८५ मंडळे बाधित जिल्ह्यात १ हजार ३८३ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यात जिल्ह्यातील एकूण ८५ मंडळे ...

Rain of complaints to insurance company after heavy rains | अतिवृष्टीनंतर विमा कंपनीकड तक्रारींचा पाऊस

अतिवृष्टीनंतर विमा कंपनीकड तक्रारींचा पाऊस

Next

चौकट....

अतिवृष्टीने ८५ मंडळे बाधित

जिल्ह्यात १ हजार ३८३ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यात जिल्ह्यातील एकूण ८५ मंडळे बाधित झाली आहेत. यामध्ये नांदेड तालुक्यातील ९ मंडळ, अर्धापूर - २, कंधार - ७, लोहा - ७, देगलूर - ७, मुखेड - ८, बिलोली - ५, नायगाव - ६, धर्माबाद - ४, उमरी - ४, भोकर - ५, मुदखेड - ३, हदगाव - ७, हिमायतनगर- २ तर किनवट तालुक्यातील ९ मंडळातील गावांना बाधा पोहोचली आहे. त्यात जिरायत क्षेत्र ३ लाख ४२ हजार ५४ हेक्टर, बागायत - ९ हजार २११ हेक्टर तर फळपिकांचे ३५२ हेक्टरचे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे.

पंचनाम्याचे काम सुरू- चलवदे

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानूसार ३ लाख ५१ हजार ६१७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सध्या महसुल विभागाच्या सहकार्याने पंचानामे करण्याचे काम सुरू असून पुढील आठ दिवसात सर्व तालुक्यातील अहवाल प्राप्त होतील. त्यानंतर जिल्ह्यात प्रत्यक्षात किती नुकसान झाले हे समजेल. शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यात विमा कंपनीकडे नुकसान भरपाईसाठी दावे करावेत. - आर. बी. चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

Web Title: Rain of complaints to insurance company after heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.