जिल्ह्यात पाऊस सरासरी पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:22 AM2021-09-14T04:22:28+5:302021-09-14T04:22:28+5:30
जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ८९१ मि.मी. इतकी आहे. जिल्ह्यात सप्टेंबरच्या मध्यातच पावसाने ही सरासरी ओलांडली आहे. आजघडीला ९७३.४० मि.मी ...
जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ८९१ मि.मी. इतकी आहे. जिल्ह्यात सप्टेंबरच्या मध्यातच पावसाने ही सरासरी ओलांडली आहे. आजघडीला ९७३.४० मि.मी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात तब्बल १०९.२१ टक्के पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या २५३ मि.मी. पाऊस अधिक झाला आहे.
सर्वाधिक १३२ टक्के पाऊस बिलोली तालुक्यात झाला आहे. बिलोली तालुक्यात सरासरी ९१०.९० मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. प्रत्यक्षात येथे १ हजार २०९ मि.मी. पाऊस झाला. नायगाव तालुक्यात १२८ टक्के, धर्माबाद १२९, मुखेड १२५, कंधार ११७, लोहा १२५, हदगाव १०१, भोकर १०२, देगलूर १२०, किनवट ११२, मुदखेड १०३, हिमायतनगर ११५, उमरी १०७, अर्धापूर तालुक्यात १२२ टक्के पाऊस झाला. नांदेड आणि माहूर तालुक्यात मात्र पावसाने अद्याप सरासरी गाठली नाही. विशेष म्हणजे माहूर तालुका हा सर्वाधिक पाऊस होणारा तालुका आहे. येथे ९१.५० टक्के पाऊस झाला आहे. नांदेड तालुक्यातही ९६.३० टक्केच पाऊस झाला आहे.