कंधार, नायगाव, मुदखेड, बिलोली तालुक्यांत पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:26 AM2019-06-29T00:26:08+5:302019-06-29T00:27:03+5:30
जिल्ह्यातील नायगाव, कंधार, मुदखेड, बिलोली, हदगाव, लोहा तालुक्यांत शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडला़ पावसामुळे खोळंबलेल्या पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला असे सांगितले जाते़ तर दुसरीकडे नेहमीप्रमाणे वीज गुल झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली़
नांदेड : जिल्ह्यातील नायगाव, कंधार, मुदखेड, बिलोली, हदगाव, लोहा तालुक्यांत शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडला़ पावसामुळे खोळंबलेल्या पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला असे सांगितले जाते़ तर दुसरीकडे नेहमीप्रमाणे वीज गुल झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली़
कंधार तालुक्यातील कंधार, बारूळ, कौठा परिसरात जोरदार पाऊस झाला़ बारुळ येथे तब्बल एक तास पाऊस पडला़ पावसामुळे नेहमीप्रमाणे वीज गुल होवून वादळी वारेही झाले़ बहाद्दरपुरा परिसरातही विजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली़ बळीराजात आनंदाचे वातावरण पसरले़
नायगाव तालुक्यातील नरसी, घुंगराळा, गडगा परिसरातही पाऊस पडल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे़ पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणीची कामे थांबवली होती़ शुक्रवारच्या पावसाने अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला़
बिलोली तालुक्यातही जोरदार पाऊस पडला़ मुदखेड येथेही पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांचे चेहरे उजळले़ लोहा तालुक्यातील शेवडी बा़, माळाकोळी परिसरात जोरदार पाऊस झाला़ मुखेड येथे सायंकाळी ढग भरून आले होते़ पावसाची हजेरी काही लागली नाही़ दरम्यान, नांदेड शहरातही रिमझिम पाऊस पडला़ एकूणच पावसामुळे शेतकºयांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे़