नांदेड शहरात रिमझिम पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:28 AM2018-07-16T00:28:51+5:302018-07-16T00:29:05+5:30

गेल्या काही दिवसांपासून नांदेड शहरात अधूनमधून पाऊस हजेरी लावत आहे़ शनिवारी सायंकाळी जोरदार पावसानंतर रविवारी दिवसभर उघडीप दिली होती़ आज सूर्यदर्शनही झाले होते़ त्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरात हलक्या सरी कोसळल्या़ आतापर्यंत जिल्ह्यात ३७३़६२ मि़मी़ पाऊस झाला़

 Rainfall in Nanded city | नांदेड शहरात रिमझिम पाऊस

नांदेड शहरात रिमझिम पाऊस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : गेल्या काही दिवसांपासून नांदेड शहरात अधूनमधून पाऊस हजेरी लावत आहे़ शनिवारी सायंकाळी जोरदार पावसानंतर रविवारी दिवसभर उघडीप दिली होती़ आज सूर्यदर्शनही झाले होते़ त्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरात हलक्या सरी कोसळल्या़ आतापर्यंत जिल्ह्यात ३७३़६२ मि़मी़ पाऊस झाला़
नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे़ गेल्या काही दिवसांपासून मात्र हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे़ हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असला तरी, प्रत्यक्षात नांदेड जिल्ह्यात मात्र अनेक ठिकाणी पावसाने हुलकावणी दिली आहे़ शनिवारी दिवसभर अधूनमधून पावसाची रिपरिप सुरु होती़
त्यानंतर सायंकाळी जवळपास तासभर पावसाचा चांगला जोर होता़ रविवारी सकाळी काही भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती़ दुपारी तीन वाजेच्या सुमारास नांदेडकरांना सूर्यदर्शनही झाले़ त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण होते़ सायंकाळी सहा वाजता रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती़ अवघे काही मिनिटे हा पाऊस झाला़ त्यानंतर मात्र उघडीप दिली़
रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात १२़३६ मि़मी़पाऊस झाला़ त्यात नांदेड- ५़२५, मुदखेड-५़६७, अर्धापूर-६, भोकर-९, उमरी-२१़६७, कंधार-२६़३३, लोहा-२२़६७, किनवट-४़१४, माहूर-७़२५, हदगाव-७़५७, हिमायतनगर-१२़३३, देगलूर-८़१७, बिलोली-१७़६०, धर्माबाद-१६़३३, नायगाव-१३़२०, मुखेडमध्ये १४़१४ मि़मी़पावसाची नोंद झाली़

 

Web Title:  Rainfall in Nanded city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.