नांदेड जिल्ह्याला पावसाचा तडाखा; १२ मंडळात अतिवृष्टीची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 11:46 AM2020-07-16T11:46:03+5:302020-07-16T11:50:05+5:30
जिल्ह्यात झालेल्या या पावसाने नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.
नांदेड : जिल्ह्यात बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. या पावसाने नांदेड शहरातील काही सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले. जिल्ह्यातील 12 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात 604.90 मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात मागील 4 दिवस पावसाने हजेरी लावली नव्हती. बुधवारी रात्री उशिरा मात्र जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी 37.31 मिमी पाऊस झाला. त्यात नांदेड शहरात 77 मिमी, तुप्पा 90, विष्णुपूरी 67, वसरणी 80, नांदेड ग्रामीण 82, तरोडा 83, अर्धापुर 97, दाभड 117, कालंबर 74,मालेगाव 82 मिमी,धर्माबाद मंडळात 68 मिमी आणि मांजरम मंडळात 111 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात झालेल्या या पावसाने नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. अर्धापूर तालुक्यातील उमा नदीला पूर आल्याने परिसरातील 10 गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 80 मिमी पाऊस अर्धापुर तालुक्यात तर नांदेड तालुक्यात 74 मिमी पाऊस झाला आहे. नायगाव तालुक्यात 63.60 मिमी तर लोहा तालुक्यात 50.83 मिमी पाऊस झाला आहे. तसेच पावसामुळे असणा नदीला पूर आला आहे.