संगणक क्रांतीमध्ये राजीव गांधी यांचे योगदान महत्त्वाचे-आ.राजूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:17 AM2021-05-22T04:17:03+5:302021-05-22T04:17:03+5:30
नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शहरातील गरजूंना मास्क वाटप व अन्नदान वाटपाचा ...
नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शहरातील गरजूंना मास्क वाटप व अन्नदान वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. तत्पूर्वी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित अभिवादन सोहळ्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी नांदेड दक्षिणचे आ. मोहन हंबर्डे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, महापौर मोहिनी येवनकर, जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, उपमहापौर मसूद खान, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर,काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, सुरेंद्र घोडजकर, डॉ. रेखा पाटील, अनुजा तेहरा, अनिताताई इंगोले, महिला व बालकल्याण सभापती संगीता पाटील डख, उपसभापती गीतांजली कापुरे, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, सतिश देशमुख तरोडेकर, माजी सभापती किशोर स्वामी, उमेश पवळे, नगरसेवक प्रशांत तिडके आदींची उपस्थिती होती.
यावेळी आ. हंबर्डे, गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी स्व. राजीव गांधी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. सुत्रसंचालन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य एकनाथ मोरे यांनी केले. त्यानंतर नांदेड शहरातील विविध ठिकाणी मास्क वाटप व अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला. येथील अण्णाभाऊ साठे चौकामध्ये नगरसेवक प्रशांत तिडके यांच्या पुढाकारातून कोविड रूग्ण व नातेवाईकांना अन्नदान करण्यात आले. यावेळी संतोष पांडागळे, संजय पांपटवार, सतिश देशमुख तरोडेकर, संतोष मुळे, सुरेश हाटकर यांचीही उपस्थिती होती.