बोरगडी, सिबदरा, खैरगाव, धानोऱ्यात तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:51 AM2019-03-31T00:51:28+5:302019-03-31T00:52:00+5:30

तालुक्यातील बोरगडी, सिबदरा, खैरगाव, धानोरा आदी गावांत विहिरी, बोअरचे पाणी संपल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ वरील गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे़

Rapid water shortage in Borghadi, Cibdara, Khargea, and in the forest | बोरगडी, सिबदरा, खैरगाव, धानोऱ्यात तीव्र पाणीटंचाई

बोरगडी, सिबदरा, खैरगाव, धानोऱ्यात तीव्र पाणीटंचाई

Next

हिमायतनगर : तालुक्यातील बोरगडी, सिबदरा, खैरगाव, धानोरा आदी गावांत विहिरी, बोअरचे पाणी संपल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ वरील गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे़
बोरगडी गावातील नागरिक गावाच्या बाहेरील बोअरवरून डोक्यावर, बैलगाडीने पाणी रात्रंदिवस भरत आहेत़ दरवर्षीप्रमाणे हनुमान मंदिराजवळच्या विहिरीत टँकरने पाणी टाकावे व गावकऱ्यांची तहान भागवावी, अशी मागणी माजी सरपंच दगडू काईतवाड, के़बी़ शेन्नेवाड, देवन्ना शेन्नेवाड, लक्ष्मण भैरेवाड आदींनी केली़ सिबदरा येथेही पाणीटंचाई असल्याचे प्रभाकर बाचकलवाड, मारोती भद्देवाड आदींनी सांगितले़ गावात एकाही विहिरीला व बोअरला पाणी नाही़ खैरगाव ज़ व लाईनतांडा येथे तीव्र पाणीटंचाई असून अधिग्रहण केलेल्या विहिरीचे पाणी संपल्याचे विठ्ठल गुंफलवाड यांनी सांगितले़
गावात पाणीटंचाई तीव्र आहे़ टँकरची मागणी केली आहे़ महिला, बालके पाण्यासाठी भटकंती करीत आहेत़ हिमायतनगरातील ४०० ते ५०० फुटांचे बोअर कोरडे पडत आहेत़ नगरपंचायतीने १५० बोअरद्वारा शहराला पाणीपुरवठा चालू होता़ आता ७० च्या आसपास बोअरला पाणी आहे़ परंतु, शहराला कायम पाणीपुरवठा व्यवस्था करावी, अशी मागणी असून ज्या वॉर्डात तीव्र पाणीटंचाई आहे तेथे टँकरची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे़

Web Title: Rapid water shortage in Borghadi, Cibdara, Khargea, and in the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.