राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर लिंगैक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2020 05:54 PM2020-09-01T17:54:46+5:302020-09-01T17:57:07+5:30

महाराजांच्या निधनाने महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक मधल्या त्यांच्या लाखो भक्तांवर शोककळा पसरलीय.

Rashtrasant Shivling Shivacharya Maharaj Ahmedpurkar Lingakya death at Nanded | राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर लिंगैक्य

राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर लिंगैक्य

googlenewsNext
ठळक मुद्देभारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होताराष्ट्रसंत अहमदपूर महाराज यांनी 1945 साली वैद्यकीय शिक्षण घेतले होते.

नांदेड: राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे आताच लिंगैक्य झालेत, मृत्यूसमयी ते 104 वर्षाचे होते. गेल्या चार दिवसांपासून ते नांदेडला खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र न्यूमोनिया असल्याने त्यांच्या प्रकृतीने उपचाराला साथ दिली नाही. सोमवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.चार दिवसांपूर्वी ते जिवंत समाधी घेणार आहेत अशी अफवा पसरल्याने हजारो भाविक अहमदपूर इथे जमले होते.त्यातच आज अप्पा लिंगेक्य झालेत. 

राष्ट्रसंत अहमदपूर महाराज यांनी 1945 साली वैद्यकीय शिक्षण घेतले होते.मात्र ते कधीच वैद्यकीय व्यवसायात रमले नाहीत, वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सहभाग नोंदवला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक मधल्या त्यांच्या लाखो भक्तांवर शोककळा पसरलीय.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्यातून त्यांना दोन वेळा तुरुंगवास देखील भोगला होता. अप्पांच्या जाण्याने लिंगायत समाज पोरका झाला असून समाजाची अपरिमित हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे, दरम्यान डॉ व्यंकटेश काबडे यांनी त्यांच्या मृत्यूची घोषणा केली. अहमदपूरकर महाराज यांच्या शरीरातील ऑक्सिजन स्तर खूप कमी झाला होता. तसेच श्वास घेण्यास त्यांना त्रास होत असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Rashtrasant Shivling Shivacharya Maharaj Ahmedpurkar Lingakya death at Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.