रमाई जयंतीनिमित्त शहरात रंगले विद्रोही कविसंमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:19 AM2021-02-11T04:19:33+5:302021-02-11T04:19:33+5:30
महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात महाराष्ट्र भूषण, नांदेड भूषण, जीवनगौरव तसेच कोरोना सेवा ...
महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने शहरातील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात महाराष्ट्र भूषण, नांदेड भूषण, जीवनगौरव तसेच कोरोना सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यापूर्वी परिषदेकडून सप्तरंगी साहित्य मंडळ व राज्यातील विद्रोही कविंना पाचारण करण्यात आले होते. यात सय्यद अकबर लाला आणि अध्यक्ष गोविंद बामणे यांच्यासह प्रतिभा थेटे, ज्ञानेश्वरी गुळेवाड, स्वाती मुंगल, मीनाक्षी कांबळे, उषाताई ठाकूर, बालिका बरगळ, राजेश गायकवाड, आ.ग. ढवळे, सूनिल नरवाडे, नाना वाठोरे, विठ्ठलकाका जोंधळे, शरदचंद्र हयातनगरकर, नागोराव डोंगरे, राम गायकवाड, गंगाधर ढवळे, नागोराव डोंगरे, अनुरत्न वाघमारे, रणजीत कांबळे, जाफर शेख, भगवान वाघमारे, संदीप गोणारकर, श्याम नौबते, अशोक भुरे, ॲड.. संजय भारदे आदी कवी कवयित्रींनी सहभाग नोंदवला.
सूत्रसंचालन अनुरत्न वाघमारे यांनी केले तर आभार नागोराव डोंगरे यांनी मानले.