पाणीटंचाईपासून मुक्त होण्यासाठी यंदा ४ हजार विहिरींचे पुनर्भरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:17 AM2021-05-22T04:17:08+5:302021-05-22T04:17:08+5:30
जिल्ह्यातील अस्तित्वात असलेल्या विहिरींचे, विंधन विहिरींचे भूजल पुनर्भरण करावे, असे आवाहन वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड यांनी केले आहे. ...
जिल्ह्यातील अस्तित्वात असलेल्या विहिरींचे, विंधन विहिरींचे भूजल पुनर्भरण करावे, असे आवाहन वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड यांनी केले आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या सूचनेनुसार भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष २०२१ निमित्त जिल्ह्यातील एकूण ४ हजार विहिरींच्या भूजल पुनर्भरणाचा प्रारंभ करण्यात आला.
ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करण्याची मुदत २६ मे पर्यंत नांदेड- भारतीय डाक विभागाअंतर्गत ग्रामीण डाक सेवक या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची मुदत २६ मे पर्यंत आहे. पात्र उमेदवारांनी संकेतस्थावर अर्ज भरावेत. उमेदवारांना अर्ज करताना काही तांत्रिक अडचण आल्यास मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड विभागाचे डाकघर अधीक्षक यांनी केले आहे.