अर्जापुरात कॉप्यांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:22 AM2019-05-26T00:22:23+5:302019-05-26T00:23:35+5:30

बिलोली : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकअंतर्गत बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील पानसरे महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर परीक्षेचे केंद्र असून ...

Reconstruction of Copies | अर्जापुरात कॉप्यांचा सुळसुळाट

अर्जापुरात कॉप्यांचा सुळसुळाट

Next
ठळक मुद्देमुक्त विद्यापीठाच्या परीक्षा१६०० विद्यार्थी देत आहेत परीक्षा

बिलोली : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकअंतर्गत बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील पानसरे महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर परीक्षेचे केंद्र असून या केंद्रावर विविध ठिकाणांवरुन आलेले शेकडो परीक्षार्थीपरीक्षा देत आहेत. परीक्षा केंद्रावरील विद्यार्थी सर्रास कॉपी करताना दिसत असून केंद्राबाहेर कॉपींचा सडा पहावयास मिळत आहे.
परीक्षा केंद्रावर पंधराशे ते सोळाशे परीक्षार्थी परीक्षा देताना दिसून येते़ तर काही विद्यार्थ्यांची व्यवस्था ही १९ वर्ग खोल्यांमध्ये केली. विद्यार्थी संख्येनुसार त्या ठिकाणी पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था असायला हवी़ परंतु अत्यंत कमी प्रमाणात पाण्याची व्यवस्था असल्याचे दिसून येते. वर्गखोल्यांवर पर्यवेक्षण करणारे बिलोली तालुक्यातील काही अप्रशिक्षित युवकांची नेमणूक केलेली असून, त्यांच्यासमोर परीक्षा केंद्रावर अनेक विद्यार्थी कॉपी करीत आहेत. विद्यापीठाचे भरारी पथक मात्र गायब आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या व्यक्तीसाठी दूरशिक्षण ही एक चांगली संधी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने उपलब्ध करुन दिली आहे. विद्यार्थ्यांना नोकरी करता करता शिक्षण घेण्याची घरच्या घरी अभ्यास करता येईल, अशा तज्ज्ञ लेखकांकडून लिहिलेले पुस्तक शुल्क घेवून विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येते.
याशिवाय अभ्यासक्रमातील अडचणी, शंका प्रश्न सोडविण्याकरिता अभ्यास केंद्रावर तज्ज्ञ मार्गदर्शक व प्रशिक्षित प्राध्यापकांद्वारे मार्गदर्शन देण्यात येत असते.
या सर्व सोयी सवलती उपलब्ध करुन देत असतानाच ही परीक्षा कापीमुक्त व्हावी, याकरिता शासनाने उपाययोजनासुद्धा केलेल्या आहेत, परंतु बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील पानसरे महाविद्यालयातील केंद्रावर मात्र मोठ्या प्रमाणात कॉपींचा प्रकार दिसून येत असून त्यावर विद्यार्थी नवीन शक्कल राबवित असल्याचे दिसून येते. झेरॉक्स सेंटरवर झेरॉक्स काढून परीक्षा केंद्रावर वितरीत करुन काही मंडळी आपले उखळ पांढरे करुन घेत असल्याची सर्वत्र चर्चा आहे.
सगळे गैरप्रकार होत असताना वरिष्ठ अधिकारी व भरारी पथकाला याची खबर लागू नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.दबक्या आवाजात हे सर्व संगनमताने होत असल्याचे बोलल्या जात आहे.
अप्रशिक्षित युवकांची नियुक्ती
वर्गखोल्यांवर पर्यवेक्षण करणारे बिलोली तालुक्यातील काही अप्रशिक्षित युवकांची नेमणूक केलेली असून, त्यांच्यासमोर परीक्षा केंद्रावर अनेक विद्यार्थी कॉपी करीत आहेत. विद्यापीठाचे भरारी पथक मात्र गायब आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या व्यक्तीसाठी दूरशिक्षण ही एक चांगली संधी मुक्त विद्यापीठाने उपलब्ध करुन दिली आहे.

Web Title: Reconstruction of Copies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.