नांदेडमध्ये एकाच दिवशी रेकॉर्डब्रेक रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:14 AM2021-07-15T04:14:24+5:302021-07-15T04:14:24+5:30

नांदेड : शहरात बुधवारी १४ जुलै रोजी रक्तदानाच्या उच्चांकाची नोंद करण्यात आली. लोकमत समूह आणि काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने ...

Record-breaking blood donation on the same day in Nanded | नांदेडमध्ये एकाच दिवशी रेकॉर्डब्रेक रक्तदान

नांदेडमध्ये एकाच दिवशी रेकॉर्डब्रेक रक्तदान

Next

नांदेड : शहरात बुधवारी १४ जुलै रोजी रक्तदानाच्या उच्चांकाची नोंद करण्यात आली. लोकमत समूह आणि काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या महारक्तदान शिबिरात रक्तदानाचा रेकॉर्डब्रेक आकडा गाठला गेला. या भव्य रक्तदान शिबिरात लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, राजकीय पदाधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जिल्ह्यात प्रचंड पाऊस असतानाही दुपारपर्यंत रक्तदात्यांचा एक हजाराचा आकडा ओलांडला होता. सायंकाळपर्यंत हे रक्तदान शिबिर सुरूच होते. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, राजकीय पदाधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जिल्ह्यात प्रचंड पाऊस असतानाही दुपारपर्यंत रक्तदात्यांचा एक हजाराचा आकडा ओलांडला होता. सायंकाळपर्यंत हे रक्तदान शिबिर सुरूच होते.

‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांची जयंती व देशाचे माजी गृहमंत्री (कै.) डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त या शिबिराचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, सहकार राज्यमंत्री विश्‍वजित कदम, प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री नसीम खान, ज्येष्ठ पत्रकार मधुकरराव भावे, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, विधान परिषदेतील प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आ. मोहनअण्णा हंबर्डे, आ. माधवराव पाटील जवळगावकर, जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, माजी आ. ईश्‍वरराव भोसीकर, माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित मान्यवरांचा स्मृतीचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शिबिरामध्ये आमदार मोहन हंबर्डे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर, कंधारचे तहसीलदार विजय चव्हाण, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पप्पू पाटील कोंडेकर, शहर जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे यांनी प्रामुख्याने रक्तदान केले. सकाळी ८ वाजतापासून शिबिर प्रारंभ झाले. शिबिरामध्ये जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने हजेरी लावली. तालुका मुख्यालयातील कार्यकर्ते रक्तदानासाठी उपस्थित झाले होते. आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चमुने दोन आठवड्यांपासून व्यापक तयारी करून हे शिबिर यशस्वी केले. त्यांना विविध संस्था व संघटनांची मोलाची साथ लाभली.

चौकट--------------------

योद्धा म्हणून ‘लोकमत’चे काम -चव्हाण

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ‘लोकमत’चा उल्लेख कोविड योद्धा म्हणून या कार्यक्रमात केला. चव्हाण म्हणाले, नांदेडच्या सर्व यंत्रणांनी कोविड काळात खूप चांगले काम केले. कुठं ऑक्सिजन तर कुठे बेडची कमतरता होती. परंतु या काळात कोविड योद्धा म्हणून ‘लोकमत’ने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून काम केले व शासन, प्रशासनाला दिशा दिली. ‘लोकमत’ नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासते. त्यात ‘लोकमत’ने सुरू केलेली रक्तदानाची ही चळवळ निश्चितच लोकचळवळ होऊन लाखो रुग्णांचे प्राण वाचवू शकेल, असे स्पष्ट करताना ना. चव्हाण यांनी नांदेडकरांच्यावतीने ‘लोकमत’चे आभारही मानले.

चौकट-------------

दोन्ही नेत्यांनी राज्याला दिशा दिली

स्व. जवाहरलाल दर्डा आणि स्व. शंकररावजी चव्हाण यांनी राज्याच्या विकासात खऱ्या अर्थाने दिशा दाखविण्याचे काम केले आहे. या दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यकाळात अधिकाधिक विकासावर व लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर दिल्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Record-breaking blood donation on the same day in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.