नांदेड जिल्ह्यात 8 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 05:56 PM2020-09-15T17:56:55+5:302020-09-15T17:59:12+5:30
सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरु होता.
नांदेड - जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 8 महसूल मंडळात सोमवारी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजेपर्यंत सरासरी 22.90 मि मी पाऊस झाला आहे.
सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरु होता. मंगळवारी सकाळी काही भागात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. बिलोली तालुक्यातील सगरोळी मंडळात अतिवृष्टी झाली येथे 86.90 मिमी पाऊस झाला. आदमपुर मंडळात 94.50 आणि लोहगांव मंडळात 93.00 मिमी पाऊस झाला. मुखेड तालुक्यात चांडोळा 97.75 मिमी आणि देगलुर तालुक्यात देगलूर मंडळात 75.75 मिमी , खानापुर मंडळात 83.75 मिमी आणि शहापुर मंडळात सर्वाधिक 106.25 मिमी पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीने काही भागातील खरीप पिकांचे नुकसान झाले तर काही पिकासाठी हा पाऊस उपयुक्त ठरल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली. जिल्ह्यात मुखेड तालुक्यात 48 मिमी तर कंधार तालुक्यात 38 मिमी पाऊस झाला.