थकीत देयकाची वीज वितरण कंपनीकडून वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:12 AM2021-06-30T04:12:49+5:302021-06-30T04:12:49+5:30
किनवट तालुक्यात १३४ ग्रामपंचायती असून, पाणीपुरवठा नळ योजनेचे १७५ कनेक्शन आहेत. यापोटी पाच कोटी ८९ लाख ६१ हजार रुपयांची ...
किनवट तालुक्यात १३४ ग्रामपंचायती असून, पाणीपुरवठा नळ योजनेचे १७५ कनेक्शन आहेत. यापोटी पाच कोटी ८९ लाख ६१ हजार रुपयांची थकबाकी, तर पथदिव्यांचे १६८ कनेक्शन आहेत. यापोटी १४ कोटी आठ लाख ५१ हजार रुपयांची थकबाकी अशी एकूण १९ कोटी ९८ लाख १२ हजार रुपयांची देयके येणे बाकी होते. खरे तर घरपट्टी, पाणीपट्टीतून ही देयके ग्रामपंचायतीने अदा करायला पाहिजे होती. मात्र, वर्षे नऊ वर्षे केवळ दहा हजार रुपये भरून मोकळे होणाऱ्या ग्रामपंचायतीची थकबाकी वाढतच गेली. देयके थकल्याने वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रात्रीला पथदिवे बंद राहून गावकऱ्यांना अंधारात राहण्याची तर पाणीपुरवठा योजनेचे कनेक्शन तोडल्याने नळांना पाणी येणार नसल्याने मोठी समस्या निर्माण होणार होती.
अशातच दि.२३ जून रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने पंधराव्या वित्त अयोगाच्या अनुदानातून पथदिव्यांची व पाणीपुरवठा योजनेची वीजदेयके अदा करण्याचा निर्णय घेतला आहे.