नांदेडमध्ये नव्याने पोलीस भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 05:20 AM2018-05-03T05:20:41+5:302018-05-03T05:20:41+5:30

जिल्हा पोलीस भरतीत घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर लेखी परीक्षा रद्द करण्यात आली असून नव्याने भरतीसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा होणार

 Recruitment of new police in Nanded | नांदेडमध्ये नव्याने पोलीस भरती

नांदेडमध्ये नव्याने पोलीस भरती

Next

नांदेड : जिल्हा पोलीस भरतीत घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर लेखी परीक्षा रद्द करण्यात आली असून नव्याने भरतीसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे. गैरप्रकार केलेले उमेदवार आणि एसएसजी सॉफ्टवेअर सोल्युशन कंपनीलाही बाद ठरविण्यात आले. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनीच हा घोटाळा उघडकीस आणला होता़ ओएमआर स्कॅनिंगद्वारे एसएसजी सॉफ्टवेअर कंपनीने काही उमेदवारांचे गुण वाढविले होते. आतापर्यंत कंपनीच्या दोन संचालकांसह १५ जणांना अटक झाली आहे़ त्यांच्याकडून २० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत़
पुण्यात एसआरपीएफच्या भरतीमध्येही गैरप्रकार झाल्याची माहिती पुढे आली आहे़ पुण्याच्या वानवाडी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

Web Title:  Recruitment of new police in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.