बारड ग्रामस्थांच्या तक्रारीचे निवारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:44 AM2020-12-11T04:44:21+5:302020-12-11T04:44:21+5:30
यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता एस. एस. साहुत्रे, शाखा अभियंता ओ. जी. काळे, इंजि. मोहन वडजकर, रणजित चौधरी, काँग्रेस ...
यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता एस. एस. साहुत्रे, शाखा अभियंता ओ. जी. काळे, इंजि. मोहन वडजकर, रणजित चौधरी, काँग्रेस जिल्हा सल्लागार उत्तमराव लोमटे, प्रताप देशमुख, विलास जैस्वाल, मारोती वाघमारे यांची उपस्थिती होती.
यावेळी कार्यकारी अभियंता साहुत्रे यांनी ग्रामस्थांच्या अडचणी लक्षात घेत गावाशेजारील अरुंद होणारा रस्ता रुंद करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या नाली कामाच्या बेसमध्ये त्यानुसार नवीन नाली कामे करण्यात येणार असून, रस्ता हा रुंदीकरण करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांना सांगितले. तसेच नाली साईडने दहा फुटांचा गावकऱ्यांना वापर करण्यासाठी सर्व्हिस रोडही लगेच तयार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी ग्रामस्थांना दिली आहे, तर राष्ट्रीय महामार्गावर सुशोभीकरण होणार असून, आठ फुटांचे डिव्हायडर, दोन्ही साईडने लायटिंग होणार असल्याने परिसर सुशोभित होणार आहे.