रासायनिक खतांची भाववाढ कमी करावी - किसान ब्रिगेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:18 AM2021-05-20T04:18:30+5:302021-05-20T04:18:30+5:30
शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान पडताच खताच्या किमती दुपटीने वाढवून शेतकऱ्यांवर तौक्त्ते वादळाप्रमाणे सुलतानी संकट तयार केले आहे. ...
शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान पडताच खताच्या किमती दुपटीने वाढवून शेतकऱ्यांवर तौक्त्ते वादळाप्रमाणे सुलतानी संकट तयार केले आहे. लॉकडाऊन, कोरोना संक्रमणात पूर्णतः शेतकरी, शेतमजुरांचे जीवनमान कोलमडले आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केंद्र सरकारने त्वरित थांबवावा. तसेच १२०० रूपये किमतीची खताची एक बॅग १९०० रूपयांना मिळत आहे. हेच का अच्छे दिन, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. रासायनिक खतामध्ये डीएपी, २०:२०:१०, १२:३२:१६, १०:२६:२६ या खतांच्या किमती येत्या ७ दिवसांमध्ये कमी करण्यात याव्यात, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा किसान ब्रिगेडने दिला आहे. निवेदनावर अविनाश टनमने, विनोद खुपसे, किशोर आत्राम, प्रवीण पोटेकर, विलास गावंडे, जियाखान फारुकी, आगाखान पठाण, विष्णू खराटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.