पोलिसांवर हल्ला प्रकरणात आरोपींच्या कोठडीत कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:17 AM2021-04-10T04:17:41+5:302021-04-10T04:17:41+5:30

२९ मार्च रोजी हल्ला बोल मिरवणुकीला परवानगी नाकारल्याच्या रागातून पोलिसांवर तलवार आणि भाल्याने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ...

Reduction in custody of accused in police assault case | पोलिसांवर हल्ला प्रकरणात आरोपींच्या कोठडीत कपात

पोलिसांवर हल्ला प्रकरणात आरोपींच्या कोठडीत कपात

Next

२९ मार्च रोजी हल्ला बोल मिरवणुकीला परवानगी नाकारल्याच्या रागातून पोलिसांवर तलवार आणि भाल्याने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात आठ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यात कश्मीरसिंग प्रेमसिंग हंडी, अजितपालसिंघ मुन्नासिंग तौफची, अमरजितसिंघ महाजन, मनिंदरसिंघ जसपालसिंघ लांगरी, इंदरसिंघ भट्टी, विक्रमसिंग हरभजनसिंग सेवादार, हरभजनसिंघ देवसिंघ पहरेदार, सुखासिंघ भगवानसिंघ बावरी, बलवंतसिंघ सुलतानसिंघ टाक, हरप्रीतसिंघ गरेवाल, जगजितसिंघ घडीसाज, ललकारसिंघ जुन्नी, अभिजितसिंघ सरदार, राणासिंघ टाक, कुलवंतसिंघ शाहू अशा १६ आणि इतर दोघांना अटक करण्यात आली होती. या सर्वांना मुख्य न्या. सतीश हिवाळे यांनी १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. बारा दिवसांची कोठडी अन्यायकारक असल्याचा अर्ज वरिष्ठ न्यायालयाकडे केला होता. या प्रकरणी ॲड. रमेश परळकर, ॲड. ईश्वर जोंधळे यांनी आरोपींच्या वतीने बाजू मांडली. ८ एप्रिल रोजी प्रमुख जिल्हा सत्र न्या. श्रीराम जगताप यांनी आरोपींची कोठडी कमी करीत ती ९ एप्रिल केली. आरोपीला दिलेली तीन दिवसांची कोठडी कमी करण्यात आली आहे.

Web Title: Reduction in custody of accused in police assault case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.