रिफाइंडमुळे वाढते चरबी; घाणा तेलाची मागणी वाढली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:24 AM2021-08-18T04:24:13+5:302021-08-18T04:24:13+5:30
धावपळीच्या जगात प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. त्यात आहार, विहार बदलत असल्याने त्याचे आरोग्यावरही परिणाम होत आहेत. परंतु, शरीराच्या ...
धावपळीच्या जगात प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. त्यात आहार, विहार बदलत असल्याने त्याचे आरोग्यावरही परिणाम होत आहेत. परंतु, शरीराच्या संरक्षणसाठी शेंद्रीय पालेभाज्या, फळांचा जशी मागणी वाढली आहे, तशीच लाकडी घाणा वापरून तयार केलेल्या तेलाची मागणी वाढल्याचे पहायला मिळत आहे.
म्हणून वाढत आहेत हृदयरोगी
तेल शरीरातील लवचिकता टिकवून ठेवण्याचे काम करते. एकप्रकारे वाहनातील ऑइलचे जसे वंगण म्हणून कार्य असते. त्याचप्रमाणे शरीराची यंत्रणा चालविण्यासाठी तेल महत्त्वपूर्ण ठरते. परंतु, त्यातील भेसळीमुळे हृदयरोग वाढत आहेत.
लाकडी घाण्याच्या तेलाचा पर्याय
लाकडी घाण्यातून काढलेले तेल चिकट आणि कोणतेही केमिकल न वापरता काढलेले असते. त्यामुळे ते सर्वाधिक पोषक आणि शरीराची लवचिकता टिकवून ठेवणारे असते. या तेलामध्ये एचडीएल नावाची उपयुक्त चरबी अधिक प्रमाणात असते.
रिफाइंड तेल घातक का?
रिफाइंड तेलामध्ये हॉट प्रोसिंगचा वापर केला जातो. या तेलात चरबी (चिकटपणा) आणि इतर घटक कमी जातात. परंतु, याच प्रक्रियेदरम्यान उपयुक्त चरबीही बऱ्याच अंशी कमी होते. त्यामुळे रिफाइंड तेल हे एक हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. तेलात चिकटपणा नसेल तर त्याचा वापर करूनही शरीरास आवश्यक ते घटक मिळत नाहीत. त्यातून गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी असे आजारांना तोंड फुटते.
आहारतज्ज्ञ काय म्हणतात?
निरोगी स्वास्थ, आरोग्य हवे असेल तर शरीरातील महत्त्वाचे अवयव निरोगी राहिले पाहिजे. जसे की किडणी, हृदय, मेंदू, फुप्फुसे आदी या अवयवासाठी तेल हा एक महत्त्वाचा घटक आहे. सदर तेल घाण्याच्या माध्यमातून काढलेले असेल तर या अवयवयचे आयुष्य आणखी वाढते. घाण्याच्या तेलामध्ये एचडीएल नावाच्या उपयुक्त चरबी (गुड कोलेस्टेरॉल)चे प्रमाण अधिक असते.
- डॉ. शिवानंद बासरे, आहारतज्ज्ञ, नांदेड