पत्नीला सासरी पाठवण्यास नकार; जावयाने सासऱ्याच्या छातीत वीट मारून केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 03:09 PM2020-09-18T15:09:43+5:302020-09-18T15:15:32+5:30

लग्नानंतर सासरकडून शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून महिला माहेरी आली होती

Refusal to send wife to Home; Son-In-Law killed his father-in-law | पत्नीला सासरी पाठवण्यास नकार; जावयाने सासऱ्याच्या छातीत वीट मारून केली हत्या

पत्नीला सासरी पाठवण्यास नकार; जावयाने सासऱ्याच्या छातीत वीट मारून केली हत्या

Next
ठळक मुद्देपत्नीला नांदावयास पाठवण्यास नकार दिल्याने झाला वाद

मरखेल/हणेगाव (जि. नांदेड) :  पत्नीस नांदावयास का पाठवत नाही? असे म्हणून जावयाने रमेश पांढरे (५५) या आपल्या सासऱ्याचा निर्घृण खून केला. याप्रकरणी जावई व त्याच्या वडिलांविरुद्ध मरखेल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात येऊन उपरोक्त दोघांना पोलिसांनी अटक केली. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मानूर येथे घडली. 

मानूर येथील रमेश शामराव पांढरे यांची मुलगी सुरेखा हिचा विवाह बेम्बरा येथील उमाकांत मुरलीधर सोलंकर याच्याशी दहा वर्षांपूर्वी झाला होता. दरम्यान, हत्येप्रकरणी सरपंच लचमारेड्डी यांनी मरखेल पोलीस स्टेशनला याविषयी माहिती दिली. हणेगाव येथे मयताचे शवविच्छेदन झाल्यानंतर उपरोक्त दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मयताची पत्नी चंद्रकलाबाई रमेश पांढरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वादातून जावयाने छातीवर मारली वीट
लग्नानंतर सासरकडून शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून मागील काही महिन्यांपासून सुरेखा माहेरी राहत होती. बुधवारी सुरेखाचा पती उमाकांत व सासरा मुरलीधर सोलंकर हे सुरेखाच्या माहेरी आले व तिला सासरी पाठवून देण्याचा आग्रह करू लागले. सुरेखाच्या वडिलांनी अमावास्या झाली की पाठवतो, असे सांगितल्यानंतर जावई व सासऱ्यात वाद झाला. जावई व त्याच्या वडिलाने सासऱ्यास मारहाण व शिवागीळ केली. सासऱ्याच्या छातीवर जावयाने अंगणातील वीट घेऊन मारल्याने रमेश पांढरे हे गंभीर जखमी झाले. त्यांना हणेगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. 

Web Title: Refusal to send wife to Home; Son-In-Law killed his father-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.