प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज ३० एप्रिलपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:18 AM2021-04-08T04:18:12+5:302021-04-08T04:18:12+5:30

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कार्यालयीन कामकाज जसे की, शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती चाचणी व इतर कामकाज नियंत्रित केले, तरीही गर्दी ...

Regional Transport Office closed till April 30 | प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज ३० एप्रिलपर्यंत बंद

प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज ३० एप्रिलपर्यंत बंद

Next

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कार्यालयीन कामकाज जसे की, शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती चाचणी व इतर कामकाज नियंत्रित केले, तरीही गर्दी रोखणे शक्य होत नाही. कार्यालयात कर्मचारी व अधिकारी यांचा कोरोनापासून बचाव न झाल्यास, भविष्यातील कार्यालयीन कामकाजावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता संभवते.

जिल्हाधिकारी यांचेमार्फत ५ पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र फिरण्यास अथवा एकत्र जमा होण्यास प्रतिबंध केला आहे. या कार्यालयामध्ये दैनंदिन कामकाजनिमित्त येणाऱ्या अजर्दारांची संख्या खूप जास्त असल्याने सदर जमावबंदी आदेशाची उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सद्य:स्थितीत या कार्यालयात कार्यरत असणारे २० अधिकारी, कर्मचारी, तसेच त्यांचे कुटुंबीय यांना कोरोनाची लागण झाली असल्याने कार्यालयाचे कामकाज प्रभावित झाले आहे. संबंधित कालावधीमध्ये ज्या लोकांनी शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी अपॉइंटमेंट घेतल्या आहे, अशा लोकांनी त्या अपॉइंटमेंट रद्द करून पुन्हा नवीन अपॉइंटमेंट त्यांच्या सोईप्रमाणे घ्याव्यात, जुनी अपॉइंटमेंट रद्द करणे ही प्रक्रिया ऑनलाइन असून, त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.

Web Title: Regional Transport Office closed till April 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.