किनवट नगरपालिका निवडणुकीत नातेवाईक आमने - सामने; भाऊ विरुद्ध भाऊ, आई विरुद्ध पुत्र अशा होणार लढती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 01:21 PM2017-12-05T13:21:16+5:302017-12-05T13:22:35+5:30

किनवट नगरपालिका निवडणुकीत तीन वकील, तीन पत्रकार, सात विद्यमान सदस्य, चुलत भाऊ, पिता-पूत्र, माता-पूत्र वेगवेगळ्या प्रभागात आपले नशीब आजमावित आहेत.

Relatives against relatives in Kinwant municipality elections | किनवट नगरपालिका निवडणुकीत नातेवाईक आमने - सामने; भाऊ विरुद्ध भाऊ, आई विरुद्ध पुत्र अशा होणार लढती

किनवट नगरपालिका निवडणुकीत नातेवाईक आमने - सामने; भाऊ विरुद्ध भाऊ, आई विरुद्ध पुत्र अशा होणार लढती

googlenewsNext

नांदेड : किनवट नगरपालिका निवडणुकीत तीन वकील, तीन पत्रकार, सात विद्यमान सदस्य, चुलत भाऊ, पिता-पूत्र, माता-पूत्र वेगवेगळ्या प्रभागात आपले नशीब आजमावित आहेत. एका प्रभागात तर जाऊबाई एकमेकिंच्या विरोधात उभ्या आहेत.  

नगरपालिका निवडणुकीत प्रभाग २ अ हा अनुसूचित जाती महिलाकरिता राखीव असून येथे ८ उमेदवार रिंगणात आहेत़ त्यात कांताबाई गौतम नगराळे या राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर नंदा प्रकाश नगराळे या अपक्ष म्हणून रिंगणात उभ्या आहेत़ जाऊबाईच एकमेकीच्या विरोधात उभ्या टाकल्या आहेत. प्रभाग क्ऱ५ ब हा सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित असून येथे  सुरेश दत्तात्रय मस्के, प्रभाग क्ऱ ७ ब मध्ये प्रमोद अण्णासाहेब पोहरकर, प्रभाग ९ अ मध्ये अनंतकुमार नारायण भालेराव हे तीन पत्रकार निवडणूक रिंगणात आपले नशिब आजमावत आहेत़ प्रमोद पोहरकर व अनंतकुमार भालेराव हे दोघे भाजपाकडून तर सुरेश मस्के हे प्रहार जनशक्तीकडून नारळ या निशानीवर उभे आहेत़

विद्यमान १७ नगरसेवकांपैकी ७ नगरसेवक रिंगणात आपले भाग्य आजमावित आहेत़ यात माजी नगराध्यक्षा इंदुताई शत्रुघ्न कनाके अपक्ष म्हणून, कृष्णा व्यंकटराव नेम्मानीवार काँग्रेस पक्षाकडून, अभय भीमराव महाजन काँग्रेसकडून रिंगणात उभे आहेत़ प्रियंका प्रवीण राठोड, गजानन बोलचेट्टीवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभे आहेत़ सुरज सातूरवार हे शिवसेनेकडून उभे आहेत़ राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान नगराध्यक्ष साजीद खान हेही उभे आहेत़ 

वकीलही रिंगणात असून त्यात अ‍ॅड़ तोफीक अहेमद हसन कुरेशी हे अपक्ष पण काँग्रेस पुरस्कृत, अ‍ॅड़ शंकर दुलसिंग राठोड हे शिवसेनेकडून तर अ‍ॅड़ किशोर कर्णाजी मुनेश्वर हे तीन वकील ऩ प़ च्या निवडणूक रिंगणात आहेत़ इसाखान सरदारखान, इमरान खान इसाखान हे पितापूत्र, हजाखान शहरेबानो निसारखान, साजीद खान निसारखान हे माता-पूत्र तर सुरेखा काळे, अभय महाजन हे माता-पूत्र निवडणूक रिंगणात आहेत़ काँग्रेसच्या तिकीटावर पिता-पूत्र, माता-पूत्र तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर माता-पूत्र निवडणूक लढवित आहेत़ 

या निवडणुकीत संजय गंगन्ना नेम्मानीवार हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर श्रीनिवास किशनराव नेम्मानीवार हे भाजपाकडून निवडणूक लढवित आहेत़ हे दोघे सख्खे चुलत भाऊ आहेत़ नगराध्यक्ष पदासाठी सहा   तर नगरसेवक पदाच्या १८ जागांसाठी १०८ उमेदवार रिंगणात आहेत़ उमेदवारांची भाऊगर्दी रिंगणात असून निवडणुकीचे वातावरण तापले आहे.

नगराध्यपदासाठी पती तर नगरसेवकपदासाठी पत्नी
नगराध्यक्ष पदासाठी पती तर नगरसेवकपदासाठी पत्नी निवडणूक रिंगणात आहे़  तीन पत्रकार, सात विद्यमान नगरसेवक, चुलत भाऊ, पिता - पूत्र, माता- पूत्र वेगवेगळ्या प्रभागात आपले नशीब आजमावित आहेत़ एका प्रभागात जाऊबाई एकमेकांच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत.

Web Title: Relatives against relatives in Kinwant municipality elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.