पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रावर वर्गोन्नतीचा शेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:18 AM2021-05-06T04:18:51+5:302021-05-06T04:18:51+5:30

चाैकट- शाळेत विशेष प्रशिक्षणाचे निर्देश यंदा ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढच्या वर्गात पाठविण्यात येणार आहे, त्यांचा ...

Remarks on the progress of students from 1st to 4th class | पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रावर वर्गोन्नतीचा शेरा

पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रावर वर्गोन्नतीचा शेरा

Next

चाैकट-

शाळेत विशेष प्रशिक्षणाचे निर्देश

यंदा ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढच्या वर्गात पाठविण्यात येणार आहे, त्यांचा अभ्यास मागे पडण्याची भीती आहे. त्यामुळे पुढील सत्राच्या सुरुवातीलाच शाळेत विशेष प्रशिक्षण आयोजित करण्याचे निर्देशही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिले आहेत. त्यात विद्यार्थी मित्र या पुस्तिकेचा आधार घेऊन नियमित वर्ग अध्यापन करण्याचेही निर्देश आहेत. तसेच यंदाचे नुकसान भरून काढण्यासाठी कृती कार्यक्रम आखण्यात येणार आहे.

चौकट-

कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे परीक्षा घेता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढच्या वर्गात पाठविण्याचा निर्णय झाला आहे. अशा विद्यार्थ्यांच्या प्रगतिपत्रावर वर्गोन्नत शेरा देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. - प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, जि. प. नांदेड.

चौकट-

यंदाही आम्ही घरातच आहोत. आता घरात बसण्याचा कंटाळा आला आहे. बाहेर निघता येत नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंदही घेता येत नाही. - नम्रता गालफाडे,

चौकट-

मोबाईल, टीव्ही पाहून खूप कंटाळा आला आहे. कधीपर्यंत हे दिवस राहणार आहेत. शाळा सुरू होणार की नाही. आम्ही बाहेर खेळायला कधी जायचे.

चौकट-

शाळेची खूप आठवण येत आहे. कारण मागील वर्षभरापासून आम्ही शाळेला गेलोच नाहीत. पुढच्या वर्गात प्रवेश मिळाला असला तरी त्यांचा आनंद होत नाही.

Web Title: Remarks on the progress of students from 1st to 4th class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.