आखाड्यावरुन दुचाकी लांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:14 AM2021-04-03T04:14:41+5:302021-04-03T04:14:41+5:30

देशी दारुची वाहतूक करताना पकडले शहरातील नावघाट ब्रीजवर एका वाहनातून देशी दारुची अवैध वाहतूक करताना पोलिसांनी पकडले. ही कारवाई ...

Removed the bike from the arena | आखाड्यावरुन दुचाकी लांबवली

आखाड्यावरुन दुचाकी लांबवली

Next

देशी दारुची वाहतूक करताना पकडले

शहरातील नावघाट ब्रीजवर एका वाहनातून देशी दारुची अवैध वाहतूक करताना पोलिसांनी पकडले. ही कारवाई १ मार्च राेजी करण्यात आली. पोलिसांनी (एमएच २६ बीई १६७१) या क्रमांकाचे वाहन आणि ५४ हजार रुपयांची देशी दारु जप्त केली आहे. यावेळी आरोपींनी मास्क वापरले नव्हते तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालनही केले नव्हते. या प्रकरणात इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पानटपरीमागे देशी दारुची विक्री

वाजेगाव चौकातील एसआरके पानटपरीमागे अवैधपणे देशी दारुची विक्री करण्यात येत होती. याठिकाणी दारु खरेदीसाठी नागरिकांनी गर्दीही केली होती. यातील कुणीही मास्क घातलेले नव्हते. पोलिसांनी या ठिकाणाहून सात हजार रुपयांची दारु जप्त केली. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पद्मसिंह कांबळे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

नांदेड : किनवट तालुक्यातील मौजे पडसा येथील पैनगंगा नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना २९ मार्च रोजी घडली. निखील विष्णूदास मानकर (रा. अंजनी, जि. अमरावती) असे मयताचे नाव आहे. तो सध्या माहूर येथे राहात हाेता. २९ मार्च रोजी तो पैनगंगा नदीत पोहण्यासाठी उतरला होता. यावेळी त्याचा बुडून मृत्यू झाला. या प्रकरणात पोलीस काॅन्स्टेबल विजय आडे यांनी दिलेल्या माहितीवरुन सिंदखेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Removed the bike from the arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.