नांदेड जिल्ह्यावर पुन्हा अवकाळीचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:47 AM2018-04-05T00:47:44+5:302018-04-05T00:47:44+5:30

जिल्हा प्रशासनाने येत्या शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. सध्या रबी ज्वारी व हरभरा पिकांची काढणी बहुतांश ठिकाणी अंतिम टप्प्यात असून गहू, मका व करडई पिकांची काढणीही प्रगतीपथावर असतानाच अवकाळीचे ढग जमा झाल्याने शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.

Repeated clouds on Nanded | नांदेड जिल्ह्यावर पुन्हा अवकाळीचे ढग

नांदेड जिल्ह्यावर पुन्हा अवकाळीचे ढग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्हा प्रशासनाने येत्या शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे. सध्या रबी ज्वारी व हरभरा पिकांची काढणी बहुतांश ठिकाणी अंतिम टप्प्यात असून गहू, मका व करडई पिकांची काढणीही प्रगतीपथावर असतानाच अवकाळीचे ढग जमा झाल्याने शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.
भारतीय हवामान खात्याच्या सूचनेवरुन जिल्हाधिकारी कार्यालयाने इशारा दिला आहे. त्यानुसार ६ आणि ७ एप्रिल या दिवशी जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गुरुवार, ५ आणि ६ एप्रिल रोजी जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज असून शनिवारी जिल्ह्यातील वातावरण अंधूक राहण्याची शक्यता आहे. या वातावरणात ७ एप्रिल रोजी बदल होत तापमानाचा पारा घटण्याची शक्यता असून १० एप्रिलपर्यंत हे कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअसवर जाईल. या दिवसांत अंधूक वातावरणाची शक्यता व्यक्त करीत जिल्ह्याच्या काही भागात गडगडाटी वादळे येण्याचा इशाराही भारतीय हवामान खात्याच्या निर्देशावरुन जिल्हा प्रशासनाने दिला आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांसह मनपा आयुक्त आणि सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकºयांनी पावसाचा अंदाज असल्याने कापून ठेवलेल्या पिकांची काळजी घ्यावी. या बरोबरच विजा चमकत असताना झाडाखाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, अशा सूचना दिल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील शेतकरी रबी ज्वारीसह गहू व मका पिकांची काढणी करीत आहेत. या बरोबरच हरभरा आणि करडई पिकांची काढणीही सुरु आहे. अशा स्थितीत अवकाळी पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने नुकतेच जिल्ह्यातील १ हजार १६८ गावे दुष्काळसदृश्य असल्याचे जाहीर केले आहे. त्यातच अवकाळीचे ढग दाटल्याने शेतकºयांना सतर्कता बाळगावी लागणार आहे.

फेब्रुवारीत नऊ तालुक्यांना बसला होता फटका
फेब्रुवारीमध्ये १२ आणि १३ रोजी जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला होता. १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपिटीचा तडाखा नांदेडसह कंधार, माहूर, किनवट, हदगाव, धर्माबाद, बिलोली, हिमायतनगर आणि नायगाव या नऊ तालुक्यांना सोसावा लागला होता. या तालुक्यांतील ४५२ हून अधिक गावांत गारपीट झाली होती. या गारपिटीमुळे २९ हजार ६३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते.फेब्रुवारीमध्ये शेतकºयांना अवकाळी पावसाचा फटका सोसावा लागल्यानंतर आता पुन्हा अवकाळीचे ढग घोंघावू लागल्याने शेतकºयांनी दक्षता घेण्याची गरज आहे.

Web Title: Repeated clouds on Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.