समुपदेशाने लागली संसाराची पुन्हा गोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:19 AM2018-02-23T00:19:54+5:302018-02-23T00:21:10+5:30
किरकोळ कारणांमुळे नवरा-बायकोतील तणाव वाढत जाऊन याचा शेवट घटस्फोटात होत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. मात्र, अशा नवविवाहित जोडप्यांना वेळीच समुपदेशन मिळाले तर ऐकमेकांतील गैरसमज दूर होवून ही कुटुंबे सुखाचा संसार करू शकतात. याचाच प्रत्यय पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत असलेल्या महिला सहाय्य कक्षाने दिला आहे. वर्ष २०१७ मध्ये या केंद्राकडे ६८२ तक्रारी आल्या होत्या. यातील ३२४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून १२९ प्रकरणांमध्ये यशस्वी तोडजोड करण्यात या केंद्राला यश आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : किरकोळ कारणांमुळे नवरा-बायकोतील तणाव वाढत जाऊन याचा शेवट घटस्फोटात होत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. मात्र, अशा नवविवाहित जोडप्यांना वेळीच समुपदेशन मिळाले तर ऐकमेकांतील गैरसमज दूर होवून ही कुटुंबे सुखाचा संसार करू शकतात. याचाच प्रत्यय पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत असलेल्या महिला सहाय्य कक्षाने दिला आहे. वर्ष २०१७ मध्ये या केंद्राकडे ६८२ तक्रारी आल्या होत्या. यातील ३२४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून १२९ प्रकरणांमध्ये यशस्वी तोडजोड करण्यात या केंद्राला यश आले आहे.
लग्नानंतर पुरूष आणि महिला या दोघांच्याही आपल्या जोडीदाराकडून मोठ्या अपेक्षा असतात. त्यातील काही जणांच्या अपेक्षेला तडा जातो, आणि तेथूनच सुंदर स्वप्ने उद्ध्वस्त होण्यास सुरूवात होते. सुरूवातीला एकमेकांतील किरकोळ वाद विसंवादामुळे वाढत जातात. अशावेळी या दोघांनाही समोर घेवून त्यांच्यामध्ये चर्चा घडवून आणणाºया मध्यस्थाची आवश्यकता असते. ही गरज पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत असलेल्या महिला सहाय्य कक्षाकडून भागविली जात आहे. नवविवाहितांमधील कुरबूरीच्या तक्रारी आल्यानंतर याबाबत थेट गुन्हे नोंदविण्याऐवजी या दोघांनाही महिला सहाय्य कक्षात जावून समूपदेशनाद्वारे तडजोड करण्याचा सल्ला दिला जातो. ज्या प्रकरणात दोन्ही बाजू आडमूठी भूमिका कायम ठेवत असतील तर त्यांना कायदेशिर मार्ग हाताळण्याचेही स्वातंत्र्य दिले जाते.
गेल्यावर्षी या कक्षाकडे जिल्हाभरातून तब्बल ६८२ तक्रारी आल्या होत्या. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तक्रारदारांसह त्याच्या सहकाºयाला प्रत्यक्ष बोलावून दोन्ही बाजू समजून घेतल्या जातात. आणि त्यांच्यामध्ये समन्वय साधून तडजोड घडविण्याचा प्रयत्न केला जातो. अशाच प्रकारे वर्षभरात तब्बल १२९ प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड करण्यात या केंद्राला यश आले आहे. ज्या महिलांना संरक्षण अधिकाºयामार्फत संरक्षणामध्ये सासरी नांदावयास जावयाचे आहे. अशी २२ प्रकरणे कक्षाच्या वतीने संरक्षण अधिकाºयाकडे सोपविण्यात आली. तर ४९ प्रकरणे संबंधित पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. १११ महिलांनी समूपदेशन व मार्गदर्शनानंतरही सासरच्या लोकांविरूद्ध तक्रार करण्याची तयारी दर्शविल्याने त्यांना पोलीस ठाण्याच्या नावे कायदेशिर कारवाईचे पत्र देण्यात आले.
समन्वयासाठी यांचा लाभतोय पुढाकार
पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या महिला सहाय्य कक्षात येणाºया तक्रारी सोडवून त्यांच्यामध्ये समन्वय घडविण्यामध्ये या कक्षातील कर्मचाºयांचा कटाक्ष असतो. पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्ता जाधव, पंचफुला फुलारी, मिरा बच्छेवार, विमल पोतदार, उज्वला दिग्रसे, अंजली ठाकूर, शेख आमरिन, सीमा जोंधळे या कार्यरत आहेत. हे कर्मचारी केवळ समन्वय साधण्याचेच नव्हे तर, प्रबोधनाचेही काम करतात. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात मुलां-मुलींना त्यांनी कायद्याची माहिती देवून मोठ्या प्रमाणात जनजागृतीही केली आहे.विशेष म्हणजे जोडप्यांच्या वैयक्तिक भेटी-गाठी घेऊन परिस्थिती जाणून घेण्यासोबतच संसार पुन्हा जुळावा यासाठी या कर्मचाºयांकडून विशेष प्रयत्न केला जातो.