गोपाळचावडीचे रहिवासी जिल्हा कचेरीवर धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:07 AM2017-08-02T00:07:20+5:302017-08-02T00:07:20+5:30
नवीन नांदेड भागातील गोपाळचावडी येथे दोनच दिवसांपूर्वी देशी दारुचे दुकान सुरु झाले आहे़ ते दुकान बंद करावे या मागणीसाठी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता़ त्यानंतर जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: नवीन नांदेड भागातील गोपाळचावडी येथे दोनच दिवसांपूर्वी देशी दारुचे दुकान सुरु झाले आहे़ ते दुकान बंद करावे या मागणीसाठी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता़ त्यानंतर जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़
गोपाळचावडी भागात पुन्हा देशी दारुचे दुकान उघडण्यात आले आहे़ या ठिकाणी मद्यपी बसत असून त्यामुळे महिला व तरुणींची छेड काढण्याचे प्रकारही घडत आहेत़ त्यामुळे या ठिकाणचे देशी दारुचे दुकान बंद करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली़ त्यासाठी महिलांनी मोर्चा काढला होता़ विशेष म्हणजे यापूर्वी हे दुकान बंद करण्यात आले होते.