बायपास मोजणीला शेतकºयांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:37 AM2018-03-11T00:37:31+5:302018-03-11T00:37:34+5:30
नागपूर ते सोलापूर या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग क्रं़३६१ च्या बायपास मोजणीसाठी आलेल्या महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचा-यांना शनिवारी शेतक-यांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले़ त्यामुळे प्राधिकरण कर्मचा-यांनी मोजणी न करताच काढता पाय घेतला़
लोकमत न्यूज नेटवर्क
माळाकोळी : नागपूर ते सोलापूर या प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग क्रं़३६१ च्या बायपास मोजणीसाठी आलेल्या महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचा-यांना शनिवारी शेतक-यांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले़ त्यामुळे प्राधिकरण कर्मचा-यांनी मोजणी न करताच काढता पाय घेतला़
दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या नागपूर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमीन अधिग्रहणाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. सदरील राष्ट्रीय महामार्ग गट ग्रा.प. माळाकोळी या गावातून पूर्वीच्या राज्य मार्गाप्रमाणे मोजणी करण्यात आला होता़ मात्र गावातील इमारतीचे नुकसान पाहता गावकºयांनी तीव्र विरोध केला़ माळाकोळी येथील ग्रामपंचायतीने बायपासची मागणी केली होती़ या ठरावाचा विचार करून महामार्ग प्राधिकरणानी माळाकोळीला ३ कि.मी. चा बायपास मंजूर केला़ तसेच ५ जानेवारी २०१८ ला वर्तमानपत्रात बायपासची जाहिरात प्रकाशित केली होती़
दरम्यानच्या काळात गावामध्ये महामागार्साठी दोन गट तयार झाले.एक गट महामार्ग गावातून नेण्यासाठी प्रयत्नशील होता, तर दुसरा गट बायपाससाठी आग्रही होता.
जाहिरात प्रकाशित केल्या नंतर दोन महिण्यानी महामार्ग प्राधिकरणाने कर्मचारी बायपासच्या मोजणीसाठी ९ मार्च रोजी माळाकोळी येथे पाठवले़ बायपासचा मार्ग पहिल्या गटाच्या लोकांना मान्य नसल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. शेतकºयांनी मोजणीसाठी आलेल्या कर्मचाºयांना कडाडून विरोध केला. आमच्या मालकीची जमीन सरकारला देणार नाही़ या रस्त्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे़ पूर्वीच्या सर्वेनुसारच महामार्ग होऊ द्या, अशा घोषणा देत शेतमालक व महिला आक्रमक झाल्याने कर्मचाºयांनी काढता पाय घेतला.
बायपाससाठी घेतलेला माळाकोळी ग्रामपंचायतीचा ठराव बोगस असल्याचे आरोप सदरील शेतकºयांकडून करण्यात आला असून ठरावाची चौकशी करून वरिष्ठानी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे. यावेळी संजय पवार, सुरेखा पवार, तुकाराम पवार, विश्वनाथ पवार,सिद्राम केंद्रे, संभाजी तिडके, सतीश कुलकर्णी यांच्यासह महिला व शेतकरी उपस्थित होते़