वाईच्या महारक्तदान शिबिरास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:17 AM2021-05-10T04:17:32+5:302021-05-10T04:17:32+5:30
ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक वाॅर्डात लसीकरण केंद्र असावे नांदेड : ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक वाॅर्डात लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी ...
ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक वाॅर्डात लसीकरण केंद्र असावे
नांदेड : ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक वाॅर्डात लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक दत्तात्रय डहाळे यांनी केली. नगरसेवक ज्या प्रमाणे वाॅर्डात विविध कामांसाठी पुढाकार घेतात, तसाच पुढाकार ज्येष्ठ नागरिकांसाठी घ्यावा, अशीही मागणी नागरिकांतून होत आहे.
येथील कोरोना नियंत्रणात येत आहे, ही बाब जरी चांगली असली, तरी पुढील नियंत्रण व तिसरी लाट याची भीती मनात आहे. परंतु, छोट्यामोठ्या गोष्टीवरून मी-मी, तू-तू निदर्शनास येत आहे. ही बाब बरोबर नाही. माणसाचे जीवन महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोविडकडे दुर्लक्ष होऊ नये, तसेच मध्येच निवडणुकीची हवा निर्माण करू नये. गर्दीमुळे कोरोनाचा उद्रेक होईल. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे शहरातील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरणासाठी ग्रामीण भागात नंबर लागत असल्यामुळे त्यांना वय, शारीरिक आजारामुळे जाणे अवघड आहे.
लसीकरण प्रक्रिया फारच अवघड, हा नंबर तो नंबर व केंद्र याची माहिती मोबाईलवर पाहावी लागते. अशिक्षित माणसाकडे मोबाईल नसतो. मग कृपया आधार कार्ड दाखवून लसीकरण करावे. जर प्रत्येक वाॅर्डात ही व्यवस्था झाली, तर ज्येष्ठांचे हाल होणार नाहीत. प्रत्येक वाॅर्डात शैक्षणिक संस्था बंदच आहेत. त्याचा उपयोग व त्याची यंत्रणा आपणास जनतेच्या सेवेसाठी घेता येईल, असेही दत्तात्रय डहाळे यांनी सांगितले.