पदवीधारकांवर समाज व देशाचे ऋण फेडण्याची जबाबदारी - न्या. तापडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:25 AM2021-09-10T04:25:06+5:302021-09-10T04:25:06+5:30

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित श्री रेणुकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ...

Responsibility of the society and the country to repay the debt of the graduates - Justice. Tapadiya | पदवीधारकांवर समाज व देशाचे ऋण फेडण्याची जबाबदारी - न्या. तापडिया

पदवीधारकांवर समाज व देशाचे ऋण फेडण्याची जबाबदारी - न्या. तापडिया

Next

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित श्री रेणुकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मधील उत्तीर्ण पदवीधारकांना पदवी प्रमाणपत्राचे वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड होते तर सचिव संध्या राठोड, उपाध्यक्ष किशोर जगत , महाविद्यालय विकास समितीचे सदस्य चंद्रकांत रिठ्ठे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रफुल्ल राठोड यांनी महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीवन संघर्ष आपल्या अध्यक्षीय समारोपातून व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विद्यापीठ ध्वज व मान्यवरांची मिरवणूक काढून ,सभागृहात रीतसर ध्वज स्थापन करून , विद्यापीठ गीत गायन व वंदन करून करण्यात आली. तद्नंतर कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदवीधारकांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एन.जे. एम. रेड्डी यांनी तर सूत्रसंचालन उपप्राचार्य तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र लोणे यांनी केले. परीक्षा विभाग प्रमुख डॉ. इक्बाल खान यांनी आभार व्यक्त केले. सदरील कार्यक्रमासाठी संयोजक प्रा. मोहम्मद नसीर यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Web Title: Responsibility of the society and the country to repay the debt of the graduates - Justice. Tapadiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.