उमरीत तीनशे वर्षांपूर्वीच्या महालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:50 AM2021-02-20T04:50:08+5:302021-02-20T04:50:08+5:30
पहाडगल्ली भागातील श्री महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन गुरुवारी दुपारी झाले. विश्वासशास्त्री घोडजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वेदमूर्ती रेणुकादास पळसकर, कृष्णागुरू ...
पहाडगल्ली भागातील श्री महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन गुरुवारी दुपारी झाले. विश्वासशास्त्री घोडजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वेदमूर्ती रेणुकादास पळसकर, कृष्णागुरू वाढवनकर, चंद्रकांत जोशी, प्रवीण काटे यांनी मंदिर बांधकामाच्या नियोजित जागेवर पूजन केले. लक्ष्मण डोपलवार व इंदिराबाई डोपलवार या उभयतांच्या हस्ते होम हवन करण्यात आले. कैलास देशमुख गोरठेकर व निखिल राजेश देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी शकुंतला देशमुख, सदानंद खांडरे, अनंत राखे, गणेश मदने, बद्रीनारायण मदने, नागोराव नरवाडे, अनिल मदने, मुंजप्पा नरवाडे, कैलास मदने, नगरसेविका अनुसयाबाई कटकदवणे, अंजली महाराज, रामराव साबणे, लक्ष्मण हेमके, बाळू शिंदे, मंगेश डोपलवार, रामराव मुदिराज, सोमनाथ हेमके, अंबिका हेमके, लक्ष्मण कस्तुरे, नरेंद्र येरावार आदींची यावेळी उपस्थिती होती. गेल्या तीनशे वर्षांपासून जुन्या उमरी भागात महालक्ष्मी मंदिर होते. त्याचा आता जीर्णोद्धार करण्यात येत असून याच ठिकाणी भव्य मंदिर उभारण्यात येत आहे.