लाईन ब्लॉकचा ९३ गाड्यांवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:53 AM2018-10-07T00:53:21+5:302018-10-07T00:53:51+5:30
दुहेरीकरणाच्या कामासाठी नोन-इंटर लॉक वर्किंगसाठी लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे़ त्यामुळे या लाईन ब्लॉकमुळे जवळपास ९३ गाड्यांवर परिणाम होत आहे़ त्यामध्ये ६५ गाड्या अंशत: रद्द, १३ गाड्या पूर्णत: रद्द, ८ गाड्या उशिराने धावणार आहेत तर ७ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : दुहेरीकरणाच्या कामासाठी नोन-इंटर लॉक वर्किंगसाठी लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे़ त्यामुळे या लाईन ब्लॉकमुळे जवळपास ९३ गाड्यांवर परिणाम होत आहे़ त्यामध्ये ६५ गाड्या अंशत: रद्द, १३ गाड्या पूर्णत: रद्द, ८ गाड्या उशिराने धावणार आहेत तर ७ गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आल्या आहेत.
मुदखेड-नांदेड-परभणी दुहेरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. मुदखेड ते मुगट स्थानकादरम्यान सिग्नलिंगची व्यवस्था, मुगट - नांदेड-लिंबगाव दरम्यान, दुहेरी पटरीचा वापर करता यावा म्हणून जे कार्य करणे आवश्यक आहे, त्यासाठी सहा दिवसांचा ट्राफिक ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे गुरूवार, शुक्रवार आणि शनिवारी जवळपास २८ गाड्यांवर परिणाम झाला़
रविवारी गाडी संख्या ५७५५१ पूर्णा ते आदिलाबाद सवारी गाडी पूर्णत: रद्द तर आदिलाबाद-नांदेड इंटरसिटी एक्स्प्रेस (१७४०९) भोकर रेल्वेस्थानकापर्यंतच धावेल. म्हणजेच भोकर ते नांदेड दरम्यान रद्द राहील़ मुदखेड स्थानकापासूनच ही गाडी नांदेड-आदिलाबाद इंटरसिटी एस्प्रेस भोकर ते आदिलाबाद अशी धावेल. म्हणजेच नांदेड ते भोकर दरम्यान ही गाडी रद्द असेल. काचीगुडा ते मनमाड (५७५६१) सवारी गाडी धमार्बाद पर्यंतच धावेल. परिणामी मनमाड ते काचीगुडा (५७५६२) सवारी गाडी धमार्बाद ते काचीगुडा अशी धावेल. मनमाड ते काचीगुडा (५७५६२) सवारी गाडी पूर्णा पर्यंतच धावेल. या गाडीचा रेक काचीगुडा ते मनमाड (५७५६१) सवारी गाडी पूर्णा येथूनच पूर्णा ते मनमाड अशी धावेल. पुणे ते निजामाबाद (५१४२१) सवारी गाडी परभणी पर्यंतच धावेल, परभणी ते निजामाबाद दरम्यान रद्द असेल.
निजामाबाद ते पंढरपूर (५१४३३) सवारी गाडी परभणी ते पंढरपूर अशी धावेल. निजामाबाद ते परभणी दरम्यान रद्द असेल. पंढरपूर ते निजामाबाद (५१४३४) सवारी गाडी परभणी पर्यंतच धावेल, परभणी ते निजामाबाद दरम्यान रद्द़ काचीगुडा- नारखेर सवारी गाडी धमार्बाद ते उमरी स्थानका दरम्यान ९० मिनिटे उशिरा धावेल. विशाखापटणाम ते नांदेड सुपरफास्ट एक्स्प्रेस (२०८११) निजामाबादला ४५ मिनिटे थांबेल. सोमवारी नांदेड-मेडचल, मेडचल ते नांदेड, पूर्णा ते आदिलाबाद, नांदेड ते निजामाबाद आणि आदिलाबाद ते पूर्णा या पाच सवारी गाडी पूर्णत: रद्द करण्यात आल्या आहेत़
निजामाबाद ते पंढरपूर सवारी गाडी परभणी ते पंढरपूर अशी धावेल. निजामाबाद ते परभणी दरम्यान रद्द असेल. पंढरपूर ते निजामाबाद सावारी गाडी परभणी पर्यंतच धावेल, परभणी ते निजामाबाद दरम्यान रद्द असेल. काचीगुडा ते अकोला इंटरसिटी एक्स्प्रेस धमार्बाद पर्यंतच धावेल. या गाडीचा रेक नारखेड ते काचीगुडा इंटर सिटी एक्स्प्रेस बनून धमार्बाद ते काचीगुडा अशी धावेल. नारखेड ते काचीगुडा इंटर सिटी एक्स्प्रेस पूर्णा पर्यंतच धावेल, या गाडीचे रेक काचीगुडा ते अकोला इंटरसिटी एक्स्प्रेस बनून पूर्णा ते अकोला असा धावेल. निजामाबाद ते पुणे सवारी गाडी परभणी येथूनच सुटेल, परभणी ते पुणे दरम्यान धावेल, म्हणजेच निजामाबाद ते परभणी अशी रद्द असेल. आदिलाबाद ते परळी सवारी गाडी पूर्णा ते परळी अशी धावेल, आदिलाबाद ते पूर्णा दरम्यान रद्द असेल. परळी ते आदिलाबाद सवारी गाडी पूर्णा पर्यंतच धावेल, पूर्णा ते आदिलाबाद दरम्यान रद्द असेल. संबलपुर ते नांदेड सुपर फास्ट एक्स्प्रेस निजामाबाद पर्यंतच धावेल, आणि निजामाबाद रेल्वे स्थानकापासूनच नांदेड ते संबलपुर एक्स्प्रेस बनून निजामाबाद ते संबलपुर अशी धावेल. निजामाबाद-नांदेड-निजामाबाद दरम्यान ही गाडी या दिवशी रद्द असेल.
- आदिलाबाद-नांदेड इंटरसिटी एक्स्प्रेस भोकर रेल्वे स्थानका पर्यंतच धावेल. म्हणजेच भोकर ते नांदेड दरम्यान रद्द केली आहे़ मुदखेड येथून ही गाडी नांदेड-आदिलाबाद इंटरसिटी एस्प्रेस भोकर ते आदिलाबाद अशी धावेल. म्हणजेच नांदेड ते भोकर दरम्यान ही गाडी रद्द असेल. काचीगुडा ते मनमाड सिवंगाव पर्यंतच धावेल. तर मनमाड ते काचीगुडा सवारी गाडी सिवंगाव ते काचीगुडा अशी धावेल. मनमाड ते काचीगुडा सवारी गाडी पूर्णा पर्यंतच धावेल. या गाडीचा रेक काचीगुडा ते मनमाड सवारी गाडी पूर्णा येथूनच पूर्णा ते मनमाड अशी धावेल. पुणे ते निजामाबाद सवारी गाडी परभणी पर्यंतच धावेल, परभणी ते निजामाबाद दरम्यान रद्द असेल.
- इंदौर ते यशवंतपूर साप्ताहिक एक्स्प्रेस इंदौर येथून ७ सप्टेंबर रोजी सुटेल ती परभणी,परळी, विकाराबाद मार्गे धावेल. नगरसोल-नारसापूर एक्स्प्रेस परभणी-परळी-विकाराबाद, अमरावती-तिरुपती सुपरफास्ट एक्स्प्रेस परभणी-परळी-विकाराबाद, चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेस चेन्नई येथून ७ आॅक्टोबर रोजी सुटेल ती विकाराबाद-परळी-परभणी मार्गे धावेल. मंगळवारी नांदेड-मेडचल, मेडचल ते नांदेड, पूर्णा ते आदिलाबाद, नांदेड ते निजामाबाद, आदिलाबाद ते पूर्णा, निजामाबाद ते नांदेड अशा सहा सवारी गाड्या पूर्णत: रद्द केल्या आहेत़ तर आदिलाबाद-नांदेड इंटर सिटी एक्स्प्रेस भोकर रेल्वे स्थानका पर्यंतच धावेल. म्हणजेच भोकर ते नांदेड दरम्यान रद्द केली आहे. ही गाडी मुदखेड येथून नांदेड-आदिलाबाद इंटरसिटी एस्प्रेस भोकर ते आदिलाबाद अशी धावेल.