शिक्षकांसाठीच्या विभागीय कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:53 AM2021-01-08T04:53:12+5:302021-01-08T04:53:12+5:30

नांदेड : साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या हेलस शाखेच्या वतीने शिक्षकांसाठी आयोजित मराठवाडास्तरीय विभागीय कथाकथन स्पर्धेत ...

Results of the departmental storytelling competition for teachers announced | शिक्षकांसाठीच्या विभागीय कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर

शिक्षकांसाठीच्या विभागीय कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर

Next

नांदेड : साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या हेलस शाखेच्या वतीने शिक्षकांसाठी आयोजित मराठवाडास्तरीय विभागीय कथाकथन स्पर्धेत सीमा बिराजदार यांनी प्रथम, शिरीष देशमुख यांनी द्वितीय, सुलभा मुंडे व अंबादास इंगोले यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे, तर अतुल पाटील व गीतांजली कांबळे हे उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी ठरले.

स्पर्धेचा अंतिम निकाल संयोजक कल्पना दत्तात्रय हेलसकर यांनी जाहीर केला. यावेळी सहसंयोजक प्रा.डॉ. सुहास सदाव्रते, बाबासाहेब हेलसकर, विजय वायाळ, सतीश कुलकर्णी, प्रमोद देशमुख, मंताजी ढाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. महादेव आगजाळ, कीर्ती राऊत, पी.एस. देशमुख यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सुनील साबळे आर.आर. जोशी, राम तत्तापुरे, व्यंकटेश चौधरी, वाय.जी. बेंबडे, दिलीप शृंगारपुतळे, जी.सी. नेरे, संगीता देशमुख यांच्यासह कथामाला कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.

Web Title: Results of the departmental storytelling competition for teachers announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.