पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:16 AM2021-03-22T04:16:24+5:302021-03-22T04:16:24+5:30
या बैठकीत आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे यांनी ऑनलाईन तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, ...
या बैठकीत आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे यांनी ऑनलाईन तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त सुनील लहाने, अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर, अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, मनपा आरोग्य विभागाचे डॉ. सुरेशसिंह बिसेन, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त तेजस माळवदकर आदी प्रमुख प्रत्यक्ष बैठकीस उपस्थित होते.
सदर बैठकीस आमदार बालाजी कल्याणकर, आमदार मोहन हंबर्डे यांनी ऑनलाईन सहभाग घेत सूचना केल्या. जिल्ह्यातील वजिराबाद व इतर प्रमुख बाजारपेठांमध्ये सर्व दुकान मालकांच्या कोरोना चाचण्या, महानगरपालिकेच्या जंगमवाडी, सांगवी, तरोडा, देगलूर नाका या भागातील दवाखान्यांमध्ये लसीकरण व कोरोना चाचणी सुरू करण्याची आवश्यकता त्यांनी विषद केली. आमदार हंबर्डे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचना केल्या.