दिरंगाईमुळे रुतली सायकलची चाके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 11:50 PM2018-01-08T23:50:28+5:302018-01-08T23:50:32+5:30
अतिमागास तालुक्यातील इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणा-या व शाळेपासून ५ कि़ मी़ अंतरापर्यंत राहणाºया गरजू मुलींना सायकल वाटप करण्याची योजना मानव विकास मिशनच्या वतीने राबविण्यात येते़ जिल्ह्यातील १ हजार १९४ मुलींची या योजनेसाठी निवड झाली़ सायकल वाटपासाठी ३५ लाख ८२ हजार रूपयांचा निधीही मंजूर करण्यात आला़ मात्र जि़ प़ शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष संपत आले तरी सायकल वाटप केलेच नाही़ त्यामुळे गोरगरीब मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे़
भारत दाढेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : अतिमागास तालुक्यातील इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणा-या व शाळेपासून ५ कि़ मी़ अंतरापर्यंत राहणाºया गरजू मुलींना सायकल वाटप करण्याची योजना मानव विकास मिशनच्या वतीने राबविण्यात येते़ जिल्ह्यातील १ हजार १९४ मुलींची या योजनेसाठी निवड झाली़ सायकल वाटपासाठी ३५ लाख ८२ हजार रूपयांचा निधीही मंजूर करण्यात आला़ मात्र जि़ प़ शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष संपत आले तरी सायकल वाटप केलेच नाही़ त्यामुळे गोरगरीब मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे़
मानव विकासच्या वतीने मुलींच्या शिक्षणासाठी सायकल वाटपाची योजना राबविली जाते़ सायकल खरेदी न करता त्याची रक्कम लाभार्थी मुलीच्या खात्यात थेट जमा करण्यात येते़ त्यासाठी सायकल खरेदीपूर्वी २ हजार रूपयांची रक्कम मुलींच्या बँक खात्यात टाकली जाते़ सायकल खरेदी केल्याची पावती शालेय व्यवस्थापन समितीकडे सादर केल्यानंतर उर्वरित १ हजार रूपयांचा निधी पुन्हा संबंधित मुलीच्या खात्यात जमा होतो़ या योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत होते़ राज्यात २०१३ ते २०१७ या कालावधीत १ लाख १० हजार १४३ मुलींनी या योजनेचा लाभ घेतला आहे़ असे असले तरी नांदेड जिल्ह्यात मात्र चालू शैक्षणिक वर्षात मुलींना सायकल खरेदीसाठी निधी मिळाला नाही़ जिल्हा नियोजन विभागाने मानव विकास योजनेतंर्गत ३५ लाख ८२ हजार रूपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला़
मात्र त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ही तत्परता दाखविली नाही़ मागील पाच, सहा महिन्यांपासून या सायकल वाटपाची प्रक्रिया पूर्ण होवू शकली नाही़ निधी उपलब्ध असतानाही मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकल उपलब्ध होत नसल्याने शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ यासंदर्भात जि़ प़ सदस्यांनी आक्षेप घेतला आहे़ सायकल मंजूर झालेल्या शाळा व विद्यार्थिनींची संख्या पुढीलप्रमाणे- लोहा तालुक्यात १० शाळांतील ११२ मुली, देगलूर - १४ शाळांतील २४२ मुली, बिलोली - ११ शाळा- १३५ मुली, धर्माबाद - १० शाळा- १८७ मुली, उमरी- ८ शाळा, १४५ मुली, मुदखेड - १ शाळा- १३ मुली, भोकर- ११ शाळा-१९३ मुली, हिमायतनगर - ३ शाळा- ३४ मुली, किनवट- ११ शाळा- १३१ मुली़ मंजूर झालेला निधी - लोहा- ३ लाख ३६ हजार, देगलूर- ७ लाख २६ हजार, बिलोली- ४ लाख ५ हजार, धर्माबाद -५ लाख ६१ हजार, उमरी -४ लाख ३५ हजार, मुदखेड-३९ हजार, भोकर -५ लाख ८५, हिमायतनगर -१ लाख २ हजार, किनवट- ३ लाख ९३ हजाऱ
प्रशासनाचे नियंत्रण राहिले नाही-धनगे
जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागच नव्हे,तर इतर विभागातही प्रशासनाचे नियंत्रण राहिले नाही़ मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे गत १० महिन्यांपासून कोणत्याच योजना मार्गी लागल्या नाहीत़ त्यांच्या अनुपस्थितीत अधिकारी काम करण्यास तयार नसतात़ काही विभागात अधिकाºयांच्या जागा रिक्त आहेत़ तर काही ठिकाणी प्रभारी कार्यभार आहे़ त्यामुळे सर्वसामान्यांची कामे होत नाहीत़ शिक्षण विभागात गेल्या अनेक दिवसांपासून सावळागोंधळ सुरू आहे़ कोणाचा पायपोस कुणाला नाही़ त्यामुळे गोरगरीब घरातल्या मुली ज्या शिक्षणासाठी धडपड करत आहेत, अशांनाच सुविधा मिळत नसतील तर योजना नावालाच उरतील़ - रावसाहेब धनगे, जि़ प़ सदस्य़
शाळेच्या मुख्याध्यापकाकडून इयत्ता ८ वी ते १० वीच्या मुली तसेच उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाकडून इयत्ता ११ वी ते १२ वी च्या लाभार्थी मुलींचे नाव निश्चित केले जाते़ यात गाव व शाळेपासून असलेले गावाचे अंतर याची तपशीलवार माहिती घेतली जाते़ शालेय व्यवस्थापन समितीने विद्यार्थिनीची यादी अंतिम केल्यानंतर तिचे बँकेत खाते उघडले जाते़ आरटीजीएसद्वारे खरेदीचा निधी थेट तिच्या खात्यात जमा केले जातो़