सतत अती राग येणाऱ्यांना ‘ब्रेन हॅमरेज’चा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:17 AM2021-05-23T04:17:09+5:302021-05-23T04:17:09+5:30

श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात गुणवत्ता हमी कक्ष व स्पिरिच्युअल एज्युकेशन कमिटीच्या संयुक्त विद्यमाने सिस्को वेबेक्स ...

Risk of brain haemorrhage for those who are constantly angry | सतत अती राग येणाऱ्यांना ‘ब्रेन हॅमरेज’चा धोका

सतत अती राग येणाऱ्यांना ‘ब्रेन हॅमरेज’चा धोका

googlenewsNext

श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात गुणवत्ता हमी कक्ष व स्पिरिच्युअल एज्युकेशन कमिटीच्या संयुक्त विद्यमाने सिस्को वेबेक्स या प्लॅटफॉर्मवर ' ध्यानाचे बुद्धीवर होणारे परिणाम' या विषयावरील ऑनलाईन व्याख्यानांमध्ये शनिवारी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका प्रा. डॉ. एल. व्ही. पद्मा राव, स्पिरिच्युअल एज्युकेशन कमिटीचे समन्वयक प्रा.डॉ.डी. डी.भोसले, प्रा.डॉ.अजय गव्हाणे, प्रा.डॉ.राजकुमार सोनवणे आणि प्रा.व्ही.जी.स्वामी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. मंठाळकर म्हणाले की, समाधान, समृद्धी, अभय आणि सहअस्तित्व ही चार तत्वे म्हणजे वैश्विक मानवी मूल्य आहेत. निसर्ग सर्वांना आनंदात ठेवायला तयार आहे; मात्र ही निसर्गाची देणगी स्वीकारण्याची ताकद देखील आपणास असावयास हवी. कोणत्याही प्रकारचे ध्यान चांगल्या पद्धतीने केल्यास त्याचा चांगला परिणाम होतो. माणसांनी पैसे कमावत असताना इम्युनिटी गमावता कामा नये. स्वतःची इम्युनिटी चांगली ठेवली तर कोणताही साथीचा रोग होणार नाही. प्रास्ताविक प्रा. डॉ. डी. डी. भोसले यांनी तर सूत्रसंचालन प्रा. गव्हाणे यांनी केले. आभार प्रा.डॉ.राजकुमार सोनवणे यांनी मानले.

Web Title: Risk of brain haemorrhage for those who are constantly angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.