कोरोनाचा धोका वाढला, गुरुवारी १२५ रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:18 AM2021-03-05T04:18:39+5:302021-03-05T04:18:39+5:30
जिल्ह्यात गुरुवारी ८१ कोरोना बाधितांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे घरी सुट्टी देण्यात आली आहे. त्यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन व ...
जिल्ह्यात गुरुवारी ८१ कोरोना बाधितांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे घरी सुट्टी देण्यात आली आहे. त्यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील ५८, विष्णुपुरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४, मुखेड कोविड रुग्णालयातून २, किनवट ३, देगलूर २ आणि खासगी रुग्णालयातील १२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २२ हजार ५१६ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनाच्या ६९८ रुग्णांवर जिल्ह्यात सध्या उपचार सुरू आहेत. त्यात विष्णुपुरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३९ रुग्ण उपचार घेत आहेत. नांदेडमधील जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये ६२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नवी इमारत २९, किनवट कोविड रुग्णालयात १९, मुखेड ५, हदगाव ६, महसूल कोविड केअर सेंटरमध्ये ५२, देगलूर ६ आणि खासगी रुग्णालयात ९७ रुग्ण उपचार घेत आहेत. मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात सर्वाधिक २७४ तर तालुक्यांतर्गत १०९ रुग्ण कोरोनावरील उपचार घेत आहेत. त्यातील १८ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यावरून आता ९३.६९ टक्क्यावर पोहोचले आहे. कोरोना रुग्णासाठी जिल्ह्यात विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १४६ तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये १५ खाटा उपलब्ध आहेत.