रस्ता सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 01:37 AM2018-05-13T01:37:20+5:302018-05-13T01:37:20+5:30

गेल्या दीड वर्षांच्या काळात नांदेड जिल्ह्यात विविध ९७९ अपघातांच्या घटना घडल्या़ त्यामध्ये ४१५ हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला़ त्यात कायमचे अपंगत्व आलेल्यांची संख्याही मोठी आहे़ शनिवारी जांब परिसरात वºहाडाच्या टेम्पोला झालेला अपघात हा गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात झालेल्या मोठ्या अपघातांपैकी एक होता़ या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून रस्ता सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे़ अपघातांच्या या दुष्टचक्रामुळे लग्नकार्यात मात्र विघ्न येत आहेत़

Road safety issue again on the anagram | रस्ता सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

रस्ता सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

Next
ठळक मुद्देदीड वर्षांत चारशेहून अधिक जणांना गमवावा लागला जीव

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : अडीच वर्षांपूर्वी नांदेडनजीक मालेगावजवळ देवदर्शनासाठी जाणारी जीप, ट्रक आणि मिनीडोअरचा विचित्र अपघात झाला होता़ त्यात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला होता़ दोन वर्र्षांपूर्वी विद्यापीठासमोर खाजगी ट्रॅव्हल्सच्या अपघातात दहा जणांना आपला जीव गमवावा लागला होता़ सहा महिन्यांपूर्वी देगलूर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सवर ट्रक आदळला होता़ त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता़
दरवर्षी लग्नसराईच्या काळात वºहाडींच्या वाहनांना होणाऱ्या अपघातांत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता़ या मालिकेत आता शनिवारी जांब येथे घडलेल्या भीषण अपघाताचा समावेश झाला आहे़ देशासह राज्यात घडणाºया अपघातांच्या घटनांच्या संख्येत घट व्हावी, यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु, अनेकवेळा रस्त्यांवरील वाहनांचा वेग यासह वाहनचालकांनी केलेल्या चुकांमुळे अपघाताला निमंत्रण मिळते़ जानेवारी २०१७ ते मार्च १८ या दीड वर्षांच्या कालावधीत नांदेड जिल्ह्यात अपघाताच्या एकूण ९७२ घडल्या असून यामध्ये एकूण ३९१ जण दगावले आहेत. त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात आतापर्यंत अपघातांच्या दहा घटना घडल्या असून मयतांची संख्या ४१५ पोहोचली आहे़ जिल्ह्यात जानेवारी २०१७ मध्ये ५५ अपघात झाले होते़ यामध्ये २५ जण दगावले. तर फेबु्रवारीमध्ये ४९ अपघातांत २०, मार्चमध्ये ७२ अपघात झाले. ज्यामध्ये ३४ जणांचा मृत्यू झाला. तसेच एप्रिल महिन्यातील ६५ अपघातांत ३०, मे महिन्यात ७५ अपघातांच्या घटनांत ३८, जून महिन्यात ७४ अपघात झाले. यात २७ जण दगावले. जुलै महिन्यात ७२ अपघात झाले. त्यात २० जण दगावले. तसेच आॅगस्ट महिन्यात ७१ अपघात झाले असून यामध्ये ३७ जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यात ६० अपघातांत २२ तर आॅक्टोबर महिन्यात २३ जण दगावले. नोव्हेंबर महिन्यात ६४ अपघातांत ३०, डिसेंबर महिन्यात ६७ अपघातांत १२ जणांचा मृत्यू झाला. तर सन २०१८ मधील जानेवारी महिन्यातील ६४ अपघातांत २३, फेबु्रवारीमध्ये ५८ अपघातांत २१ तर मार्च महिन्यात ६६ अपघातांमध्ये २९ जण दगावले तर ५९७ जण गंभीर जखमी झाले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात अपघाताच्या दहांपेक्षा अधिक घटना घडल्या आहेत़

उन्हाळ्यामुळे रक्ताचा तुटवडा
उन्हाळ्याचे दिवस असल्याने रक्तदान करणाºयांची संख्या रोडावली असून रक्ताचा तुटवडा भासत आहे़ परंतु, काही दिवसांपूर्वीच शासकीय रूग्णालयातील नर्सींग संघटना, नांदेड आणि वसमत येथे असे दोन रक्तदान शिबीर झाल्याने शासकीय रक्तपेढीत रक्तसाठा उपलब्ध होता़ त्यामुळे अपघातात जखमी झालेल्या रूग्णांना आवश्यक असलेल्या एबी पॉझिटिव्ह रक्त उपलब्ध होवू शकले़ दरम्यान, सध्या रक्तपेढीमध्ये निगेटीव्ह कोणतेही रक्त उपलब्ध नाही तर ओ + च्या २०, ए पॉझिटीव्ह आणि ओ पॉझिटीव्हच्या प्रत्येकी पाच बॅग उपलब्ध होत्या़ दररोज थॅलिसिमीया असलेल्या रूग्णांसाठी १२ ते १५ बॅग रक्त लागते़ एकंदरीत मागणी तेवढा रक्तसाठा नसल्याने रूग्णांच्या नातेवाईकांनाच रक्त उपलब्ध करून देण्यासाठी धावपळ करावी लागते़ रक्ताचा तुटवडा आणि गरज लक्षात घेता रक्तदात्यांनी पुढे येवून रक्तदान करण्याची गरज आहे़ तसेच सामाजिक संघटनांनी रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे़

जखमींमध्ये लहान मुलांसह नववधूचा समावेश
अपघातात जखमी झालेल्यांमध्ये लहान मुलांसह नववधूचा समावेश आहे़ ६ मे रोजी लग्न झालेल्या कोमल सोपान नारंगे सदर अपघातात जखमी झाल्या असून त्यांच्या डोक्यास दुखापत झाली आहे़ त्यांच्या मनावर या घटनेचा मोठा आघात झाला असल्याचे त्यांच्या आईने सांगितले़ त्यांच्यासह १५ जणांवर नांदेडच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत़

जखमींच्या मदतीसाठी नांदेडकरांची रुग्णालयात धाव
जवळपास सर्वच जखमी कुंभार समाजातील असून त्यांना भेटण्यासाठी कुंभार समाजातील नेत्यांनी शासकीय रूग्णालयात धाव घेतली़ तसेच योग्य उपचार मिळतील यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत़ तर काहींच्या पुढाकारातून गंभीर जखमींना औरंगाबाद तसेच नांदेड येथील खासगी रूग्णालयात पाठविण्याचे प्रयत्न सुरू होते़ यावेळी अ‍ॅड़ संजय रूईकर, कांता चारी, महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजयराव देवडे, शंकरराव, कुंभार समाज संघटनेच्या कार्याध्यक्षा ललिता कुंभार आदींनी जखमींची विचारपूस केली़

Web Title: Road safety issue again on the anagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.