भोकरमधील त्या उपद्रवी माकडाने तोडले ११ बालकांचे लचके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:44 AM2017-12-17T00:44:57+5:302017-12-17T00:45:06+5:30
भोकर : शहरात मागील अनेक दिवसापासून धुमाकूळ घालून लहान बालकांना जखमी करणाºया उपद्रवी माकडाला शनिवारी जेरबंद करण्यात वनविभाग व ग्रामस्थांना यश आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकर : शहरात मागील अनेक दिवसापासून धुमाकूळ घालून लहान बालकांना जखमी करणाºया उपद्रवी माकडाला शनिवारी जेरबंद करण्यात वनविभाग व ग्रामस्थांना यश आले.
शहरातील विविध भागात घरात घुसून माकडाने लहान बालकांना चावा घेवून जखमी केले होते. यात भाग्यश्री माने (वय ८), दुर्गा कवानकर (५), दीपाली घारके (७), सलोनी कमटलवार (६), नाजमीन शेख (७), श्रद्धा मेत्रे (९), साक्षी पांचाळ (५), आरती देवकर (७) मिर्जा अरशान बेग, पन्नु करंदीकर (४), श्रुती करंदीकर (५), खाजा रोदा ईनामदार (५) आदी जखमी झाले होते. ग्रामस्थांनी याबाबत येथील वनपरिक्षेत्र विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारींची दखल घेवून वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आशीष हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अंगद खटाणे,बी.एन. पेरलेवाड, वनरक्षक देवकत्ते, सपकाळ, एन.आर. शेलार, डी.एन. बोरकर, एम.एम. धोतरे, पालिका कर्मचारी दिलीप वाघमारे, अर्जुन नकलवाड, आनंद वागलवाड, बालाजी संगेवाड, प्रसाद नकलवाड आदी शुक्रवारपासून माकडावर पाळत ठेवून होते.
शनिवारी दुपारी तहसील कार्यालयाच्या पाठीमागील गंदेवार कॉलनीत जाळे टाकून माकडाला पकडण्यात आले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अशाच प्रकारे आणखी दोन माकडे पकडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.