नांदेडमध्ये मुलांना पळविणाऱ्या टोळीची अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:54 AM2018-06-07T00:54:21+5:302018-06-07T00:54:21+5:30

लहान मुलांना पळविणारी टोळी आल्याच्या अफवांचे पीक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत जोमात आहे़ सोशल मीडियावरुन त्यासाठी परराज्यातील महिला आणि पुरुषांचे छायाचित्र टाकून कुठलीही खात्री न करता ही अफवा पसरविली जात आहे़ त्यातून परराज्यातील अनेक कामगारांना जमावाने मारहाण करण्याच्या आतापर्यंत चार घटना घडल्या आहेत़

Rumor gang rape in Nanded | नांदेडमध्ये मुलांना पळविणाऱ्या टोळीची अफवा

नांदेडमध्ये मुलांना पळविणाऱ्या टोळीची अफवा

googlenewsNext
ठळक मुद्देसंशयावरुन मारहाणीच्या सहा घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : लहान मुलांना पळविणारी टोळी आल्याच्या अफवांचे पीक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत जोमात आहे़ सोशल मीडियावरुन त्यासाठी परराज्यातील महिला आणि पुरुषांचे छायाचित्र टाकून कुठलीही खात्री न करता ही अफवा पसरविली जात आहे़ त्यातून परराज्यातील अनेक कामगारांना जमावाने मारहाण करण्याच्या आतापर्यंत चार घटना घडल्या आहेत़
गेल्या दहा दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात लहान मुले पळविणारी टोळी फिरत असल्याचे संदेश सोशल मीडियावर येत आहेत़ त्यासाठी विविध राज्यांत मुले पळविणाºया टोळीला पकडल्याची छायाचित्रेही त्यासोबत जोडण्यात येत आहेत़ सोबतीला जमावाकडून त्यांना मारहाण होत असल्याचे व्हिडीओही टाकण्यात येत आहेत़ त्यामुळे जिल्ह्यात पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़ त्यातून अनेक ठिकाणी परराज्यातील मजूर, कामगारांना संशयावरुन मारहाणीच्या घटना घडत आहेत़
बिलोली, उमरी, धर्माबाद, अर्धापूर आदी गावांमध्ये तर नागरिकांनी तर रात्रभर जागून पहारा दिल्याची उदाहरणेही आहेत़ मंगळवारी बोंढार येथे संशयावरुन भंगार वेचणाºया चार जणांना जमावाने जबर मारहाण केली होती़ यावेळी ग्रामीण ठाण्याचे पोउपनि गजानन मोरे व इतर कर्मचाºयांनी जमावाच्या तावडीतून त्यांची सुटका केली़ यावेळी जमावाची समजूत घालताना पोउपनि मोरे यांनी चांगलीच कसरत करावी लागली़
या प्रकरणात नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे़ तर सोशल मीडियावर अफवा पसरविणाºया हिंगणी येथील तरुणाविरुद्ध बिलोली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे़
याबाबत आता पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे़ तसेच अफवांना बळी पडू नये असे आवाहनही केले आहे़
---
अफवांना बळी पडू नका, पोलिसांनी केले आवाहन
जिल्ह्यात सोशल मिडीयाद्वारे मुले पळविणारी टोळी आली असल्याच्या अफवा पसरविण्यात येत आहेत़ प्रत्यक्षात अशी कुठलीही टोळी जिल्ह्यात आली नसून नागरिकांनी अफवा पसरु नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे़ अशा प्रकारच्या अफवा पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाºयांविरुद्ध कठोर कारवाईचाही इशारा दिला़
---
मनोरुग्ण महिलेला जमावाची बेदम मारहाण
तामसा: येथील नांदेड रोडवर फिरणाºया एका अनोळखी महिलेस मुले पळविणाºया टोळीतील समजून चोप दिला. सध्या फेसबुक, व्हॉट्सअपवर लहान मुले पळवून नेणारी टोळी फिरत असल्याचा मेसेज सर्वत्र चांगलाच व्हायरल झालेला दिसून येतो. कुठल्याही प्रकारची खात्री न करता अनोळखी व्यक्तींना चांगलेच धारेवर धरले जात आहे. तसाच प्रकार तामसा येथे झाला़
एक वेडसर महिला नांदेड रोडवर एकटीच फिरत असताना लहान मुलांना पळवून नेणाºया टोळीतील महिला फिरत असल्याची बातमी तामसा शहरात वाºयासारखी पसरली़ त्यानंतर नांदेड रोडवर एकच गर्दी झाली. एवढी मोठी गर्दी पाहून महिला घाबरली़ मराठी भाषा स्पष्टपणे येत नसल्याने जमावाचा संशय बळावला़ त्यातून जमावाने महिलेला बेदम मारहाण केली़ यावेळी काही सुज्ञ नागरिकांनी मध्यस्थी करीत जमावाच्या तावडीतून त्या महिलेची सुटका केली़

Web Title: Rumor gang rape in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.