संत गुरूनानक यांनी सांगितलेला मानवतेचा धर्म जोपासला पाहिजे - रवींद्रसिंघ मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:28 AM2020-12-05T04:28:00+5:302020-12-05T04:28:00+5:30

कामठा (बु.) येथील श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शीख धर्माचे संस्थापक संत गुरूनानक यांची जयंती साजरी करण्यात ...

Saint Gurunanak's religion of humanity should be nurtured - Rabindrasingh Modi | संत गुरूनानक यांनी सांगितलेला मानवतेचा धर्म जोपासला पाहिजे - रवींद्रसिंघ मोदी

संत गुरूनानक यांनी सांगितलेला मानवतेचा धर्म जोपासला पाहिजे - रवींद्रसिंघ मोदी

Next

कामठा (बु.) येथील श्री बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शीख धर्माचे संस्थापक संत गुरूनानक यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रणजितसिंघ कामठेकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शंकर कंगारे, विश्वनाथ दासे, भीमराव गव्हाणे, चुडामण कल्याणकर, शिवदास दासे, प्रतापसिंघ कामठेकर, गंगाधर बाळगे, हरजिंदरसिंघ कामठेकर, लख्खनसिंघ आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम संत गुरूनानक यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र जिल्हावार यांनी केले. यावेळी कवी रवींद्रसिंघ मोदी लिखित ‘अनावश्यक’ या कवितासंग्रहाचे विमोचन करण्यात आले. सूत्रसंचालन अंबादास आटपलवाड यांनी केले, तर उपमुख्याध्यापक शिवानंद दासे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Web Title: Saint Gurunanak's religion of humanity should be nurtured - Rabindrasingh Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.