लोकसेवा आयोगाला डावलून ‘लॅट्रल एन्ट्री' द्वारे होणाऱ्या भरतीला संभाजी ब्रिगेडचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 05:15 PM2018-06-26T17:15:35+5:302018-06-26T17:16:37+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोगाला डावलून ‘लॅट्रल एन्ट्री' द्वारे खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना थेट सहाय्यक सचिवपदी नियुक्तीच्या निर्णयाला विरोध करत संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
नांदेड : केंद्रीय लोकसेवा आयोगाला डावलून ‘लॅट्रल एन्ट्री' द्वारे खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना थेट सहाय्यक सचिवपदी नियुक्तीच्या निर्णयाला विरोध करत संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC) डावलून ‘लॅट्रल एन्ट्री' द्वारे केंद्रीय मंत्रालयात सहाय्यक सचीवपदासाठी खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांची थेट नियुक्ती होणार आहे. सरकारचा हा निर्णय अजब असून संविधानाला डावलून घेण्यात आला आहे,खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या शासकीय क्षेत्रात नेमणूका करून सरकारी खाते सरळ खाजगी कंपन्याच्या घशात देण्याचे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडने धरणे आंदोलन केले. हा निर्णय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची थट्टा करणारा असून लोकशाहीस मारक ठरणारा आहे. यामुळे हि भरती केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फतच करावी या व इतर मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
आंदोलनात संभाजी ब्रिगेड उत्तर जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, दक्षिण जिल्हाध्यक्ष संकेत पाटील, विभागिय कार्याध्यक्ष श्रीनिवास शेजुळे, भगवान कदम, संगम लांडगे, मोहन शिंदे, संभाजी क्षीरसागर, मारोती देशमुख, दशरथ कदम, शशिकांत कलाने, शशिकांत गाढे,शाम पाटील, दीपक भरकड, गजानन इंगोले, कुंदन भोजने, आंकुश कोल्हे, आजय मुंगल, कमलेश कदम, विजय पौळ, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश पुयड, अशोक कदम, संतोष कदम विष्णु कोकाटे, आदिनाथ कदम आदिंचा सहभाग होता.