मनाठा, रुई येथे आरोग्य उपकेंद्रांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:17 AM2021-03-14T04:17:35+5:302021-03-14T04:17:35+5:30
हदगाव तालुक्यातील मनाठा आणि रुई येथील नागरिक आरोग्य उपकेंद्रासाठी वारंवार मागणी करीत होते. उपकेंद्राअभावी या भागातील जनतेला आरोग्य सेवेसाठी ...
हदगाव तालुक्यातील मनाठा आणि रुई येथील नागरिक आरोग्य उपकेंद्रासाठी वारंवार मागणी करीत होते. उपकेंद्राअभावी या भागातील जनतेला आरोग्य सेवेसाठी नांदेड किंवा हदगाव या ठिकाणी जावे लागत होते. मात्र आता अनुक्रमे एकूण ८० लाख रुपये किमतीची ही उपकेंद्रे आरोग्याच्या सर्व सोयी-सुविधांनी सज्ज असणार आहेत. मनाठा उपकेंद्राची इमारत ही १९८४ साली बांधण्यात आली होती. ३० वर्षांनंतर ही इमारत धोकादायक स्थितीमध्ये आली असून त्या ठिकाणी नवीन बांधकाम करण्यात येणार आहे. या उपकेंद्राअंतर्गत अंबाडी, मसाई तांडा, कनकेवाडी, गोरामतांडा, तळ्याचीवाडी, वरवंट, जांभळा, सावरगाव यासह आदी गावांना तर रुई येथील उपकेंद्राअंतर्गत धानोरा, शिवापूर, मानवाडी, अडा, बोरगावसह आदी गावांना लाभ होणार आहे.