आज ‘संगीत शंकर दरबार'चा समारोप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:24 AM2021-02-27T04:24:14+5:302021-02-27T04:24:14+5:30
नांदेड -भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण आणि कुसूमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आयोजित ...
नांदेड -भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण आणि कुसूमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आयोजित केला जाणारा ‘संगीत शंकर दरबार’ महोत्सव प्रत्यक्ष न होता. कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 'संगीत शंकर दरबार' या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनेलवरून मागील सोळा वर्षांतील निवडक स्मृतींना मागील दोन दिवसांपासून उजाळा दिला जातो आहे.
२७ फेब्रुवारील सायंकाळी ६:०० वाजता या कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे.
नागेश आडगावकर, डॉ. राम देशपांडे, पं. सुरेश तळवलकर यांची तालयात्रा, पंडिता शुभा मुदगल, जयंती कुमरेश, पं. गणपती भट, पं. विश्वमोहन भट, पं. उल्हास कशाळकर, पं. शिवकुमार शर्मा, पं.राजन-साजन मिश्रा या दिग्गज कलावंतांच्या झालेल्या कार्यक्रमांचा पुनरानंद रसिकांना घेता येणार आहे.
या समारोपीय सत्रातील कार्यक्रमाचा लाभ अधिकाधिक रसिकांनी घ्यावा, असे आवाहन श्री शारदा भवन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, उपाध्यक्षा अमिता चव्हाण, सचिव डी. पी. सावंत, सहसचिव उदय निंबाळकर, कोषाध्यक्ष डॉ. रावसाहेब शेंदारकर तथा संस्थेचे अन्य पदाधिकारी आणि संयोजन समितीतील संजय जोशी, रत्नाकर आपस्तंभ, अपर्णा नेरलकर, हृषिकेश नेरलकर, गिरीश देशमुख, डॉ. विश्वाधार देशमुख यांनी केले आहे.