सरपंच, उपसरपंचांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:31 AM2021-03-04T04:31:59+5:302021-03-04T04:31:59+5:30
आष्टीकरांचा अर्ज दाखल हदगाव - माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी जिल्हा बँकेसाठी मंगळवारी अर्ज दाखल केला. यावेळी अनेक ...
आष्टीकरांचा अर्ज दाखल
हदगाव - माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांनी जिल्हा बँकेसाठी मंगळवारी अर्ज दाखल केला. यावेळी अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव देशमुख, तालुका प्रमुख श्यामराव चव्हाण, संचालक प्रभाकर पत्तेवार, भगवानराव शिंदे, दिलीप बास्टेवाड, रमेश घंटलवार, बंडू पाटील, एस.एम. शिंदे, शिवा चंदेल, दीपक मुधोळकर आदीही उपस्थित होते.
कपड्याच्या दुकानात चोरी
नायगाव - येथील कवटीकवार ड्रेसेसमध्ये १ मार्चच्या रात्री चोरी झाली. चोरट्याने तिसऱ्या मजल्यावरून दुकानात प्रवेश करून रोख ३२हजार, चांदीचे शिक्के, नवीन कपडे असा एकूण ४० हजारांचा माल लंपास केला. विशेष म्हणजे हे दुकान पोलीस ठाण्याच्या शेजारीच आहे. या प्रकरणी दुकानमालक कवटीकवार यांनी पोलिसात फिर्याद दिली.
विलास जोशी यांना निरोप
हदगाव - येथील उर्ध्व पैनगंगा पाटबंधारे सिंचन शाखा क्रमांक १२ हदगाव कार्यालयातील कालवा निरीक्षक विलास मधुकर जोशी आणि अशोक दादाराव तावडे यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाला शाखाधिकारी पावरा, रविचंद्र राऊत, नरवाडे, इंगोले, लकडे, काकडे, पोले, नलवाडे आदी उपस्थित होते.
कबड्डी स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार
उमरी - शिवजयंतीनिमित्त आयोजित कबड्डी स्पर्धेत तळेगाव येथील सुभाष खंडेलोटे व त्यांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेशराव देशमुख, आयुक्त पठाण, माधवराव पाटील, कैलास फुलारी आदी उपस्थित होते.
कुंडलवाडीत मास्कचे वाटप
कुंडलवाडी - येथील ऑल इंडिया तंजीम इन्साफ शहर शाखेच्या वतीने शहरातील मुख्य बाजारपेठेत विविध व्यापारी, दुकानदार, ग्रामीण भागातील नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष माजीद नांदेडकर, उपाध्यक्ष माजीद मैनोद्दीन, सचिव फईम खान, सिद्धार्थ कांबळे, इरफान पठाण, सय्यद इजाज आदी उपस्थित होते.
संदलनिमित्त रक्तदान शिबीर
नरसी - येथील हजरत सय्यद खाकी शहावली रहमतुल्ला अलेह दर्गाहच्या संदलनिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी सपोनि महादेव पुरी यांनी रक्तदान केले. यावेळी खातीजामी इस्माईल, सय्यद यास्मीन बेगम, सय्यद सबीया यासीम, सय्यद नजीरा रहेमान आदी उपस्थित होते.
बांधकामाचे भूमिपूजन
अर्धापूर - सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थान बांधकामाचे भूमिपूजन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे यांच्या हस्ते झाले. याबांधकामावर ३ कोटी १३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. उद्घाटन जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले. कार्यक्रमास भाऊराव कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव तिडके, कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे, संजय देशमुख, अशोक सावंत, तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे आदी उपस्थित होते.
गुटखा विक्री सुरू
भोकर - भोकर शहर व परिसरात बंदीला झुगारून काही व्यापारी गुटखा विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. काहींनी नवीन शक्कल लढविली. गोळ्या-बिस्कीटच्या नावाखाली गुटखा पुड्याची विक्री सुरू करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्याची या अवैध विक्रीला मुकसंमती आहे. यामुळे पालकांत भीतीचे वातावरण पसरले.